पणजी : कळंगुट डान्स बार प्रकरण पोलीस निरीक्षक राजेश कुमार यांनाही भोवले असून उत्तर गोवा अधीक्षक प्रियांका कश्यप यांच्यापाठापोठ त्यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयातून दहा निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला. राजेश कुमार यांना साळगाव पोलीस स्थानकात हलविण्यात आले आहे. कळंगुटमध्ये जमावाने तीन डान्स बारचे बांधकाम पाडल्याचे प्रकरण व्यवस्थितपणे न हाताळल्याने ते रडारवर होते. साळगावहून नीलेश राणे यांना कळंगुटला आणण्यात आले आहे. गुरुदास कदम यांना काणकोणहून दक्षता खात्यात भ्रष्टाचारविरोधी विभागात, तर तेथून फिलोमिना डिकॉस्ता यांना काणकोण पोलीस स्थानकात हलविण्यात आले आहे. रामनाथ ऊर्फ कपिल नायक यांना मडगाव-सीआयडीमधून मुरगाव पोलीस स्थानकात पाठवण्यात आले आहे. निरीक्षक शिवराम वायंगणकर यांना राखीव दलातून आर्थिक गुन्हे विभागात, तर तेथून प्रवीण पवार यांना आगशी पोलीस स्थानकात पाठविण्यात आले आहे. देवेंद्र गाड यांना आगशी पोलीस स्थानकातून राखीव पोलीस दलात पाठविण्यात आले आहे. शैलेश नार्वेकर यांना मुरगाव पोलीस स्थानकातून वेर्णा पोलीस स्थानकात पाठविण्यात आले आहे, तर उदय परब यांना वेर्णाहून पणजीत स्पेशल ब्रँचमध्ये आणण्यात आले आहे. मुख्यालय अधीक्षक विश्राम बोरकर यांनी बदल्यांचा आदेश जारी केला. (प्रतिनिधी)
कळंगुट पोलीस निरीक्षक
By admin | Published: February 28, 2015 1:59 AM