शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

कामत यांना पाच दिवस दिलासा

By admin | Published: August 15, 2015 2:49 AM

पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात आमदार दिगंबर कामत यांना पाच दिवस जीवदान मिळाले आहे. भ्रष्टाचाराचे खटले हाताळणाऱ्या येथील विशेष न्यायालयात

पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात आमदार दिगंबर कामत यांना पाच दिवस जीवदान मिळाले आहे. भ्रष्टाचाराचे खटले हाताळणाऱ्या येथील विशेष न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून निवाडा १९ आॅगस्टपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. माजी बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव तसेच लुईस बर्जरचे माजी उपाध्यक्ष सत्यकाम मोहंती आणि जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांच्या जामीन अर्जांवर सोमवार दि. १७ रोजी फैसला होईल. या प्रकरणात पैसे हस्तांतराचे व्यवहार केलेल्या हवाला एजंट रायचंद सोनी याला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तब्बल ६ कोटींच्या गाजत असलेल्या या लाच प्रकरणात माजी मुख्यमंत्री कामत हे पोलिसांच्या रडारवर असल्याने संपूर्ण राज्याचे या प्रकरणाकडे लक्ष लागून राहिले आहे. कामत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुरेंद्र देसाई यांनी शुक्रवारी पुढील युक्तिवाद केला. युक्तिवाद संपविताना कामत यांच्या वकिलांनी न्यायालयाला कळकळीची विनंतीही केली. कोणत्याही अटी घाला, हवे तर आपले अशिल पासपोर्टही जमा करील, राज्याबाहेर जावे लागल्यास पूर्वपरवानगी घेईल; परंतु अटकपूर्व जामीन मंजूर करा, असे अ‍ॅड. सुरेंद्र देसाई म्हणाले. ‘जैका’चे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांना अटक केल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी त्यांची जबानी घेतली आहे. वाचासुंदर यांनी ही जबानी पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे दबावाखाली दिली असल्याच्या संशयास भरपूर वाव आहे, असा युक्तिवाद कामत यांच्या वकिलांनी केला असता, वाचासुंदर हे न्यायालयीन कोठडीत असताना ही जबानी झालेली आहे. तसेच या काळात त्यांना न्यायालयात हजरही करण्यात आले होते. मात्र, त्यांनी कधीच पोलिसांविरुध्द अशा प्रकारची तक्रार केली नाही, असे सरकारी अभियोक्ता गुरुप्रसाद कीर्तनी यांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणले. दिगंबर कामत आणि चर्चिल आलेमाव यांनी लाच घेतल्याची जी जबानी वाचासुंदर यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेली आहे, तसेच अन्य चौघे मिळून पाचजणांनी जी जबानी दिलेली आहे त्यावरच पोलीस कामत यांच्या अटकेसाठी जोर लावत आहेत. लुईस बर्जर कंपनीकडून लाच घेतल्याचा या दोघांवर आरोप आहे. वाचासुंदर तसेच लुईस बर्जरचे माजी उपाध्यक्ष सत्यकाम मोहंती यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेली जबानी ही न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतरच दिलेली आहे याकडे सातत्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न शुक्रवारी सुनावणी पुढे चालू ठेवताना कामत यांच्या वकिलाने केला. कामत आणि चर्चिल यांनी लाच घेतल्याची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी दिलेल्या अन्य तिघांना अजून अटक झालेली नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या पाचही जणांनी सर्वसामान्य स्थितीत जबान्या दिलेल्या नाहीत. या जबान्या स्वेच्छेने दिलेल्या आहेत, असेही म्हणता येणार नसल्याचा दावा देसाई यांनी केला. सरकारी अभियोक्त्याने यास जोरदार आक्षेप घेत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबान्या दबावाने किंवा पक्षपाती कशा असू शकतात, असा उलट सवाल केला. पोलीस कोठडीत असताना घेतलेली जबानी एकवेळ दबावाखाली म्हटले असते तर समजता येण्यासारखे होते. न्यायालयीन कोठडीत असताना या सर्व जबान्या झालेल्या आहेत, असे कीर्तनी म्हणाले. (प्रतिनिधी)