शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

जाणून घ्या मनोहर पर्रीकरांची राजकीय कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 1:59 PM

२ फेब्रुवारी २००५ ते ८ मार्च २०१२ अशी सात वर्षे पर्रीकर यांना विरोधी बाकांवर बसावे लागले.

- सद्गुरू पाटील२ फेब्रुवारी २००५ ते ८ मार्च २०१२ अशी सात वर्षे पर्रीकर यांना विरोधी बाकांवर बसावे लागले. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी कामगिरी करून दाखवली. गोव्याच्या प्रत्येक गावात आणि शहरात फिरून त्यांनी लढवय्ये विरोधी पक्षनेते अशी आपली जबरदस्त प्रतिमा तयार केली. मनोहर पर्रीकर दोनवेळा लोकसभेची निवडणूक लढले. अनेकांना ठाऊक नसेल; पण पणजीचे आमदार म्हणून काम करत असतानाही १९९६ साली पर्रीकर यांनीच उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी सूचना पक्षाने व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पर्रीकर यांना केली होती. त्यामुळे रमाकांत खलपांविरुद्ध उत्तरेत १९९६ साली पर्रीकर उभे राहिले होते.खलप ४३.४० टक्के मते मिळवून तेव्हा निवडून आले. पर्रीकर यांच्या आयुष्यातील ही दुसरी लोकसभा निवडणूक होती. पर्रीकर उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात तेव्हा चौथ्या स्थानी होते. त्यांना १६.९३ टक्के मते मिळाली होती. खलप मगोपच्या तिकिटावर लढले होते. १९९६ साली उत्तर व दक्षिण गोवा अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला. त्या वेळी भाजपचे बळ मर्र्यादित होते. मात्र, पर्रीकर नाउमेद झाले नाहीत. त्यांनी आमदार म्हणून पणजीत व विधानसभेत आपला प्रभाव सुरू केला. १९९४ साली आमदार झालेले व दोन लोकसभा निवडणुका हरलेले पर्रीकर हे २०१४ साली म्हणजे वीस वर्षांत देशाचे संरक्षणमंत्री होतील, असा विचारही कुणी केला नव्हता. १९९६ साली जेव्हा खलप लोकसभा निवडणूक जिंकले तेव्हा २०१४ साली पर्रीकर हे देशाचे संरक्षणमंत्री होतील, अशी कल्पना देखील कुणी करू शकत नव्हता.मात्र, पर्रीकर यांनी तशी उत्तुंग झेप मारली. १९९४ साली विधानसभेत पोहचलेले पर्रीकर २००० साली गोव्याचे मुख्यमंत्री बनले. २४ आॅक्टोबर २००० रोजी पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदाची पहिल्यांदा शपथ घेतली. आमदार झाल्यानंतर सहा वर्षांनी पर्रीकर मुख्यमंत्री बनले. त्या वेळी केंद्रात वाजपेयी सरकार अधिकारावर आले होते. गोव्यातील काँग्रेसमध्ये फूट पडत होती. पर्रीकर यांना या राजकीय स्थितीचा लाभ झाला. १ वर्ष २३३ दिवस पर्रीकर यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम काम केले. त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तो दिवस होता ३ जून २००२. त्या वेळी पर्रीकर हे २ वर्षे आणि २४४ दिवस मुख्यमंत्रिपदी राहिले. केंद्रात काँग्रेसची राजवट सुरू होताच, गोव्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार अधिकारावर आले. मात्र, ९ मार्च २०१२ रोजी पर्रीकर तिसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. या वेळी गोमंतकीयांनी त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत दिले होते.१३ डिसेंबर १९५५ रोजी म्हापसा येथे पर्रीकर यांचा जन्म झाला. विद्यार्थी दशेतच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. संघाचे ते स्वयंसेवक बनले. प्रथम तिसवाडीत व नंतर उत्तर गोव्यात त्यांनी संघाचे काम केले. गावागावांत ते फिरायचे. मुंबईत आयआयटीमध्ये मॅटलर्जिकल इंजिनीअरिंग ही पदवी प्राप्त करून आल्यानंतरही त्यांनी गोव्यात संघाचे काम केले. नंतर ते भाजपचे काम करू लागले. पर्रीकर यांनी राजकीय कारकिर्दीत गोव्यात कधीच मंत्रिपद स्वीकारले नाही. ते थेट मुख्यमंत्रीच झाले. १९९४ साली आमदार, मग विरोधी पक्षनेते आणि मग मुख्यमंत्री व २०१४ साली केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर देशाचे संरक्षणमंत्री असा राजकीय प्रवास पर्रीकर यांनी केला. संरक्षणमंत्रिपद भूषवूनही पुन्हा २०१७ साली गोव्यातील विचित्र राजकीय परिस्थितीमुळे पर्रीकर यांना मुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले. १४ मार्च २०१७ रोजी पर्रीकर यांनी चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २००० ते २०१८ पर्यंतच्या कालावधीत चारवेळा मुख्यमंत्री बनलेला हा नेता आहे. दोन-तीनवेळा त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले.पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदी असताना अर्थ व गृह ही दोन मोठी खाती कायम आपल्याकडे ठेवली. भाजपच्या सहभागाने गोव्यात २९ जुलै १९९८ रोजी स्व. डॉ. विली डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली गोवा राजीव काँग्रेस पक्षाचे सरकार अधिकारावर आले. भाजप व मगोप हे दोन्ही पक्ष त्या सरकारमध्ये होते. भाजपच्या आयुष्यात प्रथमच जुलै १९९८ मध्ये भाजपचा सत्तेत सहभाग घडला. मात्र, पर्रीकर त्या वेळी मंत्रिपदापासून दूर राहिले. भाजपच्या आमदारांनी तेव्हा मंत्रिपदे स्वीकारली नाहीत. मगोपने स्वीकारली. भाजपने बाहेरून पाठिंबा दिला. ते सरकार फक्त ११७ दिवस टिकले.२४ नोव्हेंबर १९९९ रोजी फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखाली गोवा पीपल्स काँग्रेस पार्टीचे सरकार अधिकारावर आले. त्या सरकारमध्ये भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदे स्वीकारली. मात्र, पर्रीकर यांनी मंत्रिपद स्वीकारले नाही. भाजपचे तीन आमदार त्या सरकारमध्ये मंत्री झाले. पर्रीकर मुद्दाम मंत्रिपदापासून दूर राहिले. सार्दिन सरकार जास्त काळ टिकणार नाही याची त्यांना कल्पना होती. ते सरकार ३३४ दिवस टिकले व मग पर्रीकर ऑक्टोबर २००० मध्ये थेट सीएम बनले.२ फेब्रुवारी २००५ ते दि. ८ मार्च २०१२ अशी सात वर्षे पर्रीकर यांना विरोधी बाकांवर बसावे लागले. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी कामगिरी करून दाखवली. गोव्याच्या प्रत्येक गावात आणि शहरात फिरून त्यांनी लढवय्ये विरोधी पक्षनेते अशी आपली जबरदस्त प्रतिमा तयार केली. यामुळेच २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे २१ उमेदवार निवडून आले. पर्रीकर यांनी २०१२ च्या निवडणुकीवेळी प्रभावी सोशल इंजिनिअरिंग केले आणि भाजपतर्फे प्रथमच सहा ख्रिस्ती उमेदवार निवडून आले. नोव्हेंबर २०१४ मध्ये पर्रीकर यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून जावे लागले. मार्च २०१७ मध्ये पुन्हा ते गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून आले. पणजीत १९९४ सालापासून एकदाही आमदारकीची निवडणूक पर्रीकर हरले नाहीत, हा मोठा विक्रम आहे. म्हापशात जन्मलेले पर्रीकर राजधानी पणजीतूून निवडणूक लढवतात व प्रत्येक विधानसभा निवडणुकीत व पणजीतील पोटनिवडणुकीतही जिंकून येतात, असा करिष्मा पणजीत तरी यापूर्वी कुणालाच करता आला नाही. पंचवीस वर्षांपैकी तेवीस-चोवीस वर्षे पर्रीकर यांनी पणजीची आमदारकी भूषवली. राजकारणात राहूनही पर्रीकर यांनी स्वत:ची प्रतिमा जपली. ती डागाळली गेली नाही, हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य ठरले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा