शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

गोव्याचा ७५ टक्के ग्रामीण भाग कोविडबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 6:47 PM

साखळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत सध्या एकूण २४९ सक्रीय कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

पणजी : जागतिक नकाशावर पर्यटनस्थळ म्हणून मिरवणाºया गोव्याचा ७५ टक्के ग्रामीण भाग कोविडबाधित झाला आहे. आरोग्य खात्याकडून प्राप्त अधिकृत बुलेटिन तपासले असता गुरुवारी तब्बल ७१३ नवे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यात ७५ टक्के ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कक्षेतील आहेत.साखळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत सध्या एकूण २४९ सक्रीय कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. गुरुवारी या केंद्राच्या कक्षेत २७ नवे कोविडबाधित आढळले. वाळपई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत एकूण १५९, पेडणेत २0७, काणकोण ११७, शिरोडा ९५, कुडचडें १३५, हळदोणे ११७, मडकई ४६, कुठ्ठाळी ११८, चिंबल १४३, नावेली १0४, शिवोली १२५, कोलवाळ १४३ तसेच कांदोळी, बेतकी, बाळ्ळी, कांसावली, कुडतरी, धारबांदोडा, लोटली, चिंचिणी, खोर्ली व कासारवर्णे आदी ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कक्षेतही कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एक ते दोन आरोग्य केंद्रांमध्ये ८ देखिल पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत.                                आॅगस्टमध्ये रोज सरासरी ५ मृत्यू!आॅगस्ट महिना गोमंतकीयांसाठी अत्यंत घात महिना ठरला. आतापर्र्यंत एकूण २१२ मृत्यू झाले आहेत, त्यात १५0 बळी हे केवळ आॅगस्टमध्येच गेलेले आहेत. गेल्या तीन दिवसातच तब्बल १७ बळी गेले आहेत.- आॅगस्टमध्ये जे १५0 मृत्यू झाले त्यात ११५ पुरुष आणि ३५ महिलांचा समावेश आहे. कोविडने मृत्युचे प्रमाण महिलांमध्ये कमी आहे.- लोकसंख्या घनता असलेल्या सासष्टी तालुक्यात आॅगस्टमध्ये सर्वाधिक ४३ मृत्यू झाले. यात केवळ मडगांव शहरातील ३४ जणांचा समावेश आहे.-  गेल्या तीन दिवसात कोविडने मृत्युचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. मंगळवारी १ सप्टेंबर रोजी ४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्युचा आलेख वाढतच गेला. दुसºयाच दिवशी २ रोजी १0 बळी गेले तर काल गुरुवारी ८ बळी गेले...............आॅगस्टमधील तालुकानिहाय मृत्यूसासष्टी   ४३मुरगांव     ३३तिसवाडी   २४फोंडा       १६बार्देस       १३डिचोली    0५पेडणे       0४केपें         0४धारबांदोडा   0१सांगे            0४काणकोण     0१सत्तरी          0२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या