शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

तोकड्या कपड्यातील ललना, खिशाला लावून जातात चुना; महिलांचेही मोठे डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 1:17 PM

भव्य-दिव्यतेचा भपका; फेसाळणारा उत्साह

नरेश डोंगरे / आशिष रॉयलोकमत न्यूज नेटवर्कपणजी (गोवा) : छोट्या बोटीच्या माध्यमातून एकदा कॅसिनोच्या जहाजावर प्रवेश केल्यानंतर सारेच भव्य-दिव्य असल्याचा भास होतो. अंतर्गत झगमगाट, तोकड्या कपड्यातील महिला-मुली आणि फेसाळणारा उत्साह पाहून काही क्षणासाठी अनेकांची मती आणि स्थिती गुंग झाल्यासारखी होत नसेल तर नवलच. त्याच अवस्थेतच अनेकांचे खिसे खुलतात अन् काही वेळेनंतर ते रिकामेही होतात.

मांडवीच्या किनाऱ्यावर फुटपाथलगत कॅसिनो संचालकांनी पॉश ऑफिसेस थाटली आहेत. येथे कूपन दाखवून एन्ट्री फीची विचारणा करणाऱ्या ग्राहकांकडून दोन हजारांपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत मनमानी एन्ट्री फी घेतली जाते. त्यानंतर ग्राहकांच्या हातावर विशिष्ट बँड बांधले जातात. ते बँड पाहूनच बाऊन्सर ग्राहकाला आतमध्ये प्रवेश देतो. तेथून ग्राहकाला कॅसिनोवर नेण्यासाठी एक छोटी बोट येते. पाच-दहा मिनिटांच्या अंतराने ही बोट नदीपात्रात असलेल्या विशाल जहाजावर (कॅसिनोत) ग्राहकाला नेऊन सोडते. तेथील  कॅसिनाेत चक्रीपासून तीन पत्ती, अंदर बाहर असे विविध जुगाराचे पर्याय असलेले वेगवेगळे टेबल सजलेले असतात. या टेबलवर कूपन घेऊन ग्राहक जातो आणि डाव लावतो. पहिला दुसरा डाव हमखास जिंकतो, नंतर आत्मविश्वास वाढला की आणखी डाव खेळतो. त्यातून लालसा वाढते, नंतर  खिशातील रोकड कधी संपते ते त्याचे त्यालाही कळत नाही.

महिलांचेही मोठे डावजुगार खेळण्यासाठी वेगवेगळ्या वयोगटांतील जत्थेच्या जत्थे कॅसिनोत येत असल्याचे दिसून येते. पुरुषांच्या गर्दीत तरुणी आणि महिलासुद्धा नोटांच्या रूपातील कॉईनची गड्डी घेऊन टेबलवर बसलेल्या दिसतात. पुरुषांसोबत त्यासुद्धा उत्साहाने मोठमोठे डाव लावतात. 

सुंदर ललनाकडे पाहून लागताे चुनाजुगार खेळणाऱ्याला बसल्या ठिकाणी पाहिजे ती दारू उपलब्ध करून दिली जाते. दारू पिऊन तरंगलेल्या अवस्थेत जुगारावर डाव लावताना सुंदर ललना एकप्रकारे जुगारावर मोठा डाव लावण्यासाठी ग्राहक बनून आलेल्या आणि जुगारी बनलेल्या व्यक्तीला प्रोत्साहित करत असतात. 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस