शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

दरडी कोसळण्याच्या प्रकारांची चौकशी होणार; नितीन गडकरी यांची ग्वाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2024 10:02 AM

दोषी कंत्राटदारावर कारवाईचाही इशारा; मोपा लिंक रोडचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे/मोपा : राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळण्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे. मालपे-न्हयबाग येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ वर कोसळलेल्या दरड प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यासाठी महामार्गाचे अधिकारी पाहणी करतील, त्यानंतर या प्रकरणात दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.

काल, गुरुवारी मंत्री गडकरी यांच्या हस्ते तब्बल १२०० कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या मोपा लिंक रोडचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते, कार्यक्रमास डावीकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री रोहन खंवटे, मंत्री मातिन गुदिन्हो, आमदार जीत आरोलकर, आमदार डॉ. दिव्या ' राणे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुदिन ढवळीकर, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार उल्हास तुयेकर, आमदार प्रवीण आलेकर व बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर उपस्थित होते.

मोपा लिंक रोडमुळे गोव्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. राज्यात भविष्यात लोकसंख्येमुळे प्रदूषण होऊ नये यासाठी गोवा सरकारने आताच हरित मास्टर प्लॅन आखण्याची गरज आहे. तरच गोवा हे सुंदर आणि प्रदूषण मुक्त राहणार आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी त्या दृष्टिकोनातून काम करावे. उत्तराखंड किंवा केदारनाथ सारख्या घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी आतापासून गोव्याच्या नियोजनबद्ध विकासाकडे लक्ष द्या. संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे विणणार आहे. काश्मीर तो कन्याकुमारी हा महामार्ग बनविण्याचे काम हाती घेण्यात आल्याचेही गडकरी म्हणाले.

राज्यात प्रदूषण रोखण्यासाठी ईलेक्ट्रॉनिक वाहनांवर भर देण्याचे सांगून गडकरी म्हणाले की, जुआरी पुलावर रेस्टॉरंट बांधण्याचा प्रकल्प होता. त्या दृष्टीने कामही सुरू होते. मात्र, संबंधित कंपनीने ऐनवेळी हा प्रकल्प थांबवला. मात्र, मुख्यमंत्री यासाठी आग्रही असून लवकरच हा ड्रीम प्रोजेक्ट आकार घेईल. न्हयबाग- धारगाळ व पेढे येथे अपघात होतात, यासाठी श्रीपादभाऊंच्या तीन मागण्या केल्या होत्या त्या मान्य केल्याचे गडकरी यांनी सांगितले. दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन सिद्धा उपाध्ये यांनी केले.

बोरी पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन लोकांची समजूत काढावी. ५०० कोटी रुपये दार्जुन हा प्रकल्प साकारणार आहे. गोव्यासाठी २५ हजार कोटी रुपये खर्च करून विविध रस्ते प्रकल्प साकारले जाणार आहेत, २०२८ पर्यंत ६५ कि.मी.चा ६ हजार कोटींचा गोव्याबाहेरुन जाणारा रस्ता लवकरच तयार होईल. न्हयबाग, पेडे, धारगळ ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात वाढत आहेत. याचा विचार करून या ठिकाणी लवकरच उहाण पूल उभारण्याची घोषणा गडकरी यांनी यावेळी केली.

राज्याला नवी ओळख मिळतेय

मोपा लिंक रोडचे उद‌घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. मंत्री गडकरी यांच्या सहकार्यामुळेच गोष्यात विविध रस्ते, पूल प्रकल्प उभा रहात आहेत. दिलेल्या वेळेत संबंधित कंपनीने हा प्रकल्प पूर्ण केल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतु, जुआरी पूल अशा प्रकल्पातून गोव्याची वेगळी ओळख निर्माण होत आहे, केंद्राचे गोव्याला नेहमीच सहकार्य राहिले असून त्यामुळे हे प्रकल्प साकारल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

टोलमध्ये सवलत...

राष्ट्रीय महामार्गावर टोल बसविण्यात आला आहे. मात्र याला विरोध होत असून टोलमधून स्थानिकांना वगळावे, अशी मागणी होत आहे. याचाबत मुख्यमंत्री सावंत यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. टोलमाफी दिली जाऊ शकत नाही. परंतु, आम्ही स्थानिकांना सवलत देण्याचा विचार करत असल्याचे गडकरी म्हणाले.

आता येणार 'मडगाव बायपास'

गोव्यातील दळणवळण सेवा सुविधा अद्ययावत आणि गतिमान करण्याचा केंद्राचा विचार आहे. त्या दृष्टीने आता लवकरच ४५ किलोमिटरचा नवीन 'मडगाव बायपास प्रकल्प येणार आहे. नावेली, कुंकळली, काणकोण ते कर्नाटकर सिमेपर्यंत चार ते सहापदरी हा प्रकल्प असणार आहे. जवळपास साडेतीन हजार कोटींचा हा प्रकल्प असेल, अशी घोषणा गडकरी यांनी केली.

कार्यकारिणीला गडकरी आज देणार 'कानमंत्र'

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी शुक्रवारी भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत संबोधणार आहेत. राज्य कार्यकारिणीवरील सदस्यांसह सर्व मंडल अध्यक्ष, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मिळून ७०० ते ८०० जणांची व्यापक बैठक प्रथमच होणार असल्याने गडकरी काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. लोकसभा निवडणूक नुकतीच झाली. गोच्यातील दोन जागांपैकी एका जागेवर भाजपला पराभव पत्करावा लागला. निकालानंतर प्रथमच राज्य कार्यकारिणीची ही बैठक होत असल्याने या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. गडकरी यांचे काल सायंकाळी गोव्यात आगमन झाले. विमानतळावर शिष्टाचारमंत्री मावीन गुदिन्हो व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांचे स्वागत केले.

दाबोळी ते वेर्णा फ्लायओव्हर

राज्य सरकार दाबोळीसाठी गंभीर आहे. त्यामुळेच दाबोळी विमानतळ ते वेर्णा जंक्शनपर्यंत तब्बल १ हजार ५०० कोटी रुपये खर्च करून पलायओव्हर उभारण्याचा संकल्प आहे. त्यासाठी केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावरुन दाबोळी विमानतळ बंद पड‌णार नाही, हे लक्षात घ्यावे, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाNitin Gadkariनितीन गडकरीNitin Gadkariनितीन गडकरीPramod Sawantप्रमोद सावंत