ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 20 - संततधार पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाण्याची पातळी वाढली असून साळावलीचे धरण भरण्यास केवळ ५0 ते ६0 सें. मि. बाकी आहे. पाऊस अखंड चालू राहिल्यास आज हे धरण भरुन पाणी ओव्हरफ्लो होऊ शकते. मात्र पाण्याचा विसर्ग आपोआप होत असल्याने धरण भरले तरी त्यापासून धोका नाही, असे जलस्रोत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. केवळ अंजुणे धरणाच्या बाबतीत पाण्याची पातळी वाढली की दरवाजे उघडावे लागतात. जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता संदिप नाडकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अंजुणे धरण वगळता इतर धरणांच्याबाबतीत ती भरली की पाण्याचा विसर्ग आपोआप होतो त्यामुळे कोणताही धोका नाही. अंजुणे धरण भरण्यासाठी अजून साडेआठ मिटर पातळी बाकी आहे.
गोव्यातील धरणांची पातळी वाढली
By admin | Published: July 20, 2016 7:09 PM