पणजी : गोव्यात कोविड रुग्णांची संख्या खूपच वाढू लागल्याने आणि इस्पितळांवर ताण येऊ लागल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात लोकडाऊनची घोषणा केली. उद्या गुरुवारी सायंकाळी ते सोमवारी सकाळी पर्यंत लॉकडाऊन असेल. (Lockdown announced in state from 29th April 7 pm to the morning of 3rd May. Essential services & industrial activities allowed, public transport to remain shut.)
गोव्यात सध्या दर 24 तासांत 2 हजार नवे रुग्ण आढळतात व तीस कोविडग्रस्तांचा जीव जातो. मुख्यमंत्री म्हणाले की लोकांनी काम नसताना बाहेर फिरू नये किंवा गर्दी करू नये असे सांगितले तरी लोक ऐकत नाहीत. त्यामुळेच चार दिवस गोव्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. चार दिवस गोव्यात पर्यटन बंद राहील. ज्या पर्यटकांनी गोव्यात खोली आरक्षित केली आहे त्यांनी येऊन खोलीतच रहावे. आम्ही राज्याच्या सीमा बंद केलेल्या नाहीत. सीमा खुल्या राहतील पण चार दिवस राज्यात कुठेच पर्यटक फिरू शकणार नाहीत.