पणजी : लोकसभा निवडणुका एप्रील महिन्यात होऊ शकतात असा अंदाज गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी वर्तविला आहे. सर्वपक्षीय बैठक संपल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा अंदाज वर्तविला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी वर्मा यांनी शनिवारी गोव्यात लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून गोव्यातील सर्व पक्षांची बैठक बोलविली होती. या बैठकीला भाजप, आम आदमी पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते असी माहिती वर्मा यांनी दिली.
निवडणुकीत सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी सार्वजनिक चर्चा करावी अशी सूचना सर्व पक्षांना करण्यात आल्याची माहिती वर्मा यांनी पत्रकारांना दिली. यावेळी पत्रकारांनी निवडणूका केव्हा जाहीर होऊ शकतात असे विचारले असता ते म्हणाले की निवडणुकीचे वेळापत्रक भारतीय मुख्य निवडणूक आयुक्त जाहीर करीत असतो. एप्रील महिन्यात लोकसा निवडणुका होण्याची शक्यता आहे असेही वर्मा यांनी सांगितले.