शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

लोकायुक्तांना प्रतीक्षा सभापतींच्या मालमत्तेच्या तपशीलाची...

By admin | Published: September 28, 2016 1:54 AM

पणजी : लोकायुक्तांनी राज्यातील सर्व आमदार व मंत्र्यांना मालमत्तेचा तपशील सादर करण्यास दिलेली दोन महिन्यांची अतिरिक्त मुदतही संपुष्टात आली आहे.

पणजी : लोकायुक्तांनी राज्यातील सर्व आमदार व मंत्र्यांना मालमत्तेचा तपशील सादर करण्यास दिलेली दोन महिन्यांची अतिरिक्त मुदतही संपुष्टात आली आहे. बहुतेक सर्व मंत्री व आमदारांनी मालमत्तेचा तपशील लेखी स्वरूपात लोकायुक्त कार्यालयास सादर केलेला आहे; पण सभापती असलेले मयेचे आमदार अनंत शेट यांनी अजूनही माहिती सादर केलेली नाही. लोकायुक्त कार्यालय आता त्यांना आणखी एकदा अखेरचे स्मरणपत्र पाठविण्याची शक्यता आहे. गेल्या जून महिन्यात लोकायुक्तांनी लोकायुक्त कायद्यानुसार जाहीर नोटीस देऊन गोवा विधानसभेच्या सर्व सदस्यांना मालमत्तेचा तपशील सादर करण्यास सांगितले होते. प्रारंभी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्या वेळी मोजक्याच सदस्यांनी मालमत्तेचा तपशील सादर केला. त्यानंतर दोन महिन्यांची मुदत आमदारांना देण्यात आली. मंत्र्यांना स्मरणपत्रे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामार्फत तर आमदारांना राज्यपालांच्या कार्यालयामार्फत लोकायुक्त पाठवत असतात. चाळीसपैकी बहुतेकांनी मालमत्तेचा तपशील दिला. पाच आमदारच माहिती देणे बाकी होते. त्यापैकी तिघा-चौघांनी अलीकडेच लोकायुक्त कार्यालयात लेखी स्वरूपात माहिती दिली; पण सभापती शेट यांच्याकडून माहिती सादर झालेली नाही. लोकायुक्त कार्यालय थोडी प्रतीक्षा करेल व नंतर एक अहवाल तयार करून तो अहवाल सरकारला पाठविला जाणार आहे. (खास प्रतिनिधी)