- नारायण गावस पणजी - गोवा सरकारने गोवा कामगार भरती साेसायटी तसेच गोवा मनुष्यबळ विकास महामंडळ यांच्या अंतर्गत नाेकरी भरत केली जात आहे. ती एक प्रकारे लूट आहे. या कामगारांना जो पगार आहे ताे दिला जात नाही, जे कामगार या साेसायटी मार्फत गेली अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांना अजूनही हातात १० हजार पगार मिळतो तर नुकतीच भरती केलेल्या कामगारांना त्यांच्यापेक्षा जास्त पगार मिळतो. याची सखाेल चौकशी हाेणे गरजेचे आहे, असे कॉँग्रेसचे नेते विजय भिके यांनी पत्रकार परिषदेत केली.
विजय भिके म्हणाले, गोवा कामगार भरती साेसायटी अंतर्गत अनेक कामगार गेली अनेक वर्षे सुरक्षा रक्षक तसेच साफसफाईचे कामे करत आहेत. त्यांचा जो पगार आहे ताे माेठ्या प्रमाणात कापला जातो. तसेच त्यांचा पगार वेळेवर दिला जात नाही. तर आता सरकारने गाेवा मनुष्यबळ विकास महामंंडळाअंतर्गत सुरक्षा रक्षक तसेच इतर कामगार घेतले आहेत. त्यांना जास्त पगार दिला जातो. हा भेदभाव कशाला. तसेच सर्वांना समान पगार द्यावा. या कामगारांचा पगार कुणाच्या खिशात जातो याची चौकशी व्हावी.
कॉँग्रेसचे नेते व गाेवा सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नझारत म्हणाले, हे सरकार या कंत्राटी कामगारांवर खूप अन्याय करत आहेत. त्यांना वेळेवर पगार दिला जात नाही. जे कमी दर्जाचे कामगार आहेत त्यांच्याकडून साफसफाईची कामे करुन घेतली जातात पण पगार तुटपुंजा दिला जातो. मुख्यमंत्र्यांनी या अगोदर या कामगारांना चांगला पगार दिला जाणार असे अश्वासन दिले होते. त्यांना याचा आता विसर पडला आहे, असे जॉन नझार म्हणाले.