पणजीः बलात्काराच्या खोट्या तक्रारी नोंदवून लोकांना ब्लॊकमेलिंग करणाऱ्या दोन गुजराती युवतींच्या कारनाम्याचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश करेपर्यंत या युवतींनी मुंबई आणि दमणमध्येही असेच कारामे करून कोट्यवधी रुपये कमाविले असल्याची माहिती आहे.
बलात्काराच्या खोट्या तक्रारी नोंदविण्याची धमकी देऊन धनाड्य लोकांना ब्लेकमेलिंग करणाऱ्या गुजरातमधील दोन युवती आणि त्यांना सहकार्य करणारा एक दलाल अशा तिघांच्या कृष्णकृत्यांचा कोलवाळ पोलिसांनी भांडाफोड केला होता. त्यानंतर कळंगूट पोलिसांनी त्यांना अटक केली होती. गोव्यात असे कारनामे करण्यापूर्वी त्यांनी खुद्द गुजरातमध्ये तसेच मुंबई आणि दमणमध्येही अनेक धनाड्य लोकांना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून मोठी रक्कम जमविली अशी माहिती गोवा पोलिसांच्या सूत्रांकडून देण्यात आली. या प्रकरणाचा तपास सध्या क्राईम ब्रँच करीत आहे. सोशल मिडियाच्या माद्यमातून सावध हेरून त्यांना लक्ष्य बनविणे, त्यानंतर त्यांच्याशी सलगी करणे आणि नंतर बलात्कार केल्याचा आरोप करणे. त्याच्याकडे मोठ्या रक्कमेची मागणी करणे आणि पैसे न दिल्यास पोलीसात तक्रार नोंदविण्याची धमकी देणे अशी त्यांची मोडस ऑपरेन्डी होती. पैसे न दिल्यास पोलीसात तक्रार करायच्या. तक्रार करण्यासाठी पोलीस स्थानकात जाताना एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे आपले कपडे स्वत:च फाडून घेऊन खरोखऱ्च पीडीत युवती वाटाव्यात अशा पद्धतीने सर्व नाटके चालली होती. गुजरातमध्ये भल्या भल्यांना या पद्धतीने लुबाडून त्यांनी मोर्चा गोव्याकडे वळविला होता. त्याच नादात त्यांनी आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार कोलवाळ पोलिस स्थानकात केली, आणि तिथेच मोठी चूक करून बसल्या. कोलवाळ पोलिसांनी केवळ त्यांच्या तक्रारीवर तपास न करता त्यांचा सखोल तपास केला. लोकांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी बलात्काराच्या खोट्या तक्रारी नोंदविण्याचा या युवतींचा धंदा असल्याचे तपासातून उघडकीस आले.
गुजरात्यांनाच करायच्या बळीचे बकरेया युवतींनी गोवा, गुजरात, महाराष्ट्र आणि दमणमध्ये जे गुन्हे केले त्या सर्व गुन्ह्यात एक समान गोष्ट आढळून आली आहे, आणि ती म्हणजे ब्लॅकमेलिंगसाठी बळीचा बकरा त्या गुजरातीच माणसाला निवडायच्या. त्यांचा पोलिसांशी ओळखी किंवा वशिला असू नये यासाठी त्यांना दुसऱ्या राज्यात नेऊन फसविण्याचे काम त्या करीत होत्या.