पणजी : मडगाव अर्बन बँकेची स्थिती चांगलीच आहे. ही बँक यापुढे आणखी सुदृढ बनेल, असा विश्वास गेली 28 ते 30 वर्षे या बँकेशी निगडीत राहिलेले माजी चेअरमन व माजी खासदार रमाकांत आंगले यांनी येथे व्यक्त केले.आंगले यांनी बँकेच्या चेअरमनपदाचा व संचालकपदाचा राजीनामा सादर केला आहे. आंगले यांनी मडगाव अर्बन बँकेच्या संचालकपदी यापूर्वी अनेकांना स्वत:च्या पॅनलमधून निवडून आणले व या बँकेची स्थिती सुधारावी म्हणूनही योगदान दिले आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने लोकमतशी सविस्तरपणो बोलताना आंगले म्हणाले की, 1999 साली मी मडगाव अर्बनची सुत्रे हाती घेतली तेव्हा बँकेकडे फक्त 14 कोटींच्या ठेवी होत्या. मी बँकेचा आता राजीनामा दिला, त्यावेळी बँकेच्या ठेवी 333 कोटी आहेत. आमच्याकडे 135 कर्मचारी असून सर्वाना दर महिन्यास अगदी वेळेत वेतन दिले जाते. एक दिवस अगोदरच आम्ही वेतन देतो. मडगाव अर्बन बँकेला आरबीआयने 1क् कोटींनी एनपीए कमी करा असे सांगितले होते पण आम्ही तेरा कोटींनी कमी करून दाखवला. आम्ही बँकेसाठी 40 कोटींची तरतुद स्वतंत्रपणो करून ठेवली आहे. म्हणजेच 40 कोटी रुपये बाजूलाच ठेवले आहेत. प्रत्येक बँकेला अशी तरतुद करावी लागते. आंगले म्हणाले, की मडगाव अर्बनची स्थिती सुधारली आहे व यापुढेही ती सुधारेलच. किशोर नाव्रेकर यांनी बँकेच्या चेअरमनपदाची सुत्रे हाती घ्यावीत अशी विनंती मी त्यांना यापूर्वीच केली होती. सगळे संचालक माङयासोबत आहेत. माझा सल्ला जेव्हा जेव्हा चेअरमन किंवा संचालकांना घ्यावा असे वाटेल तेव्हा मी त्यांना सल्ला देईनच. कारण मडगाव अर्बन बँकेशी मी भावनिकदृष्टय़ा जोडलो गेलेलो आहे. ही बँक मी प्रसंगी पदरमोड करूनही चालवली. काही लोकांनी सोने गहाण ठेवून कज्रे घेतली होती, त्यांना मी कज्रे भरण्यासाठी मदत केल्याची उदाहरणो आहेत. माङया पत्नीचे निधन झाल्यानंतर माङयावरील टेन्शन वाढले. मी खंतावलो. अशा स्थितीत मी लक्ष केंद्रीत करू शकत नाही व न्याय देऊ शकणार नाही. म्हणून किशोर नाव्रेकर व माङया अन्य सहकारी संचालकांना मी बँकेची सुत्रे हाती घेण्यास सांगितले. नाव्रेकर व इतरांनी काल गुरुवारी देखील माङयाशी सल्लामसलत केली आहे. आमच्यामध्ये अतिशय चांगले वातावरण आहे. बँकेच्या हितासाठीच यापुढेही मी वावरेन. फक्त पदावर असणार नाही.
मडगाव अर्बन सुदृढ बनेल : आंगले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 9:20 PM