मडगाव: रेल्वे प्रवासात मध्यप्रदेश राज्यातील ग्वाल्हेर येथील एका प्रवाशाचे बॅग पळवून आतील एक लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व दोन हजार रोख लंपास करण्याची घटना गोव्यात मडगावात घडली. या प्रकरणाी शंशाक आरोटे यांनी कोकण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
अज्ञाताविरोधात पोलिसांनी भादंसंच्या ३७९ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. नाईक पुढील तपास करीत आहेत. मडगाव रेल्वे स्थानकावर २१ ऑगस्ट रोजी चोरीची वरील घटना घडली होती. तक्रारदार मंगला एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करीत असताना , अज्ञाताने त्यांची बॅग पळविली होती.