फोंडा : मडकई येथील नवदुर्गा मंदिराचा प्रश्न पुन्हा एकदा जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचला असून, शुक्रवारी न्यायालयात युक्तिवाद चालू असताना बाहेर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिले होते.
सविस्तर वृत्तानुसार नवदुर्गा प्रतिष्ठान ने 2014 मध्ये नवदुर्गा मंदिर हे सर्वसामान्य लोकांसाठी खुले असावे. त्याचबरोबर जी मूर्ती पूर्वीची आहे, तीच असावी या संदर्भात न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. अचानक पुन्हा एकदा पूर्वीच्या समितीने घातलेली ती केस रद्दबातल करावे असा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे.
या विषयावरून मागचे काही दिवस न्यायालयात युक्तिवाद चालू होता. शुक्रवारी या संदर्भात युक्तिवाद चालू असताना ग्रामस्थ मोठ्या संख्येने न्यायालयाच्या आवारात उभे राहिल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा चिघळणार की काय असे परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी संपूर्ण युक्तिवाद पूर्ण झाला असून पुढील सुनावणी 23 तारीख पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.