पणजी : खाणी तसेच जेटींवरील खनिज विक्रीविना पडून राहिल्याने खाण व्यवसाय सुरू करण्याच्या बाबतीत तो मोठा अडथळा ठरला आहे. तब्बल १ कोटी १0 लाख टन खनिज अजून वेगवेगळ्या खाणींच्या ठिकाणी तसेच जेटींवर पडून आहे. ई-लिलावांना मिळणारा थंडा प्रतिसाद तसेच लिज क्षेत्राबाहेर खनिज टाकण्यास केंद्रानेही नाकारलेली परवानगी हा येत्या महिन्यापासून खाणी सुरू करण्याच्या बाबतीत मोठा अडथळा ठरला आहे. लिज क्षेत्राबाहेर खनिज टाकण्यास राज्य सरकारने मागितलेली परवानगी केंद्रीय खाण मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत नाकारली आहे. परिणामी खाणी तसेच जेटींवर खनिज पडून राहिल्यास खाणी सुरू करायच्या कशा, असा प्रश्न खाणमालकांनाही पडला आहे. तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर येत्या महिन्यापासून गोव्यात खाणी सुरूहोत आहेत. कोडली तसेच डिचोली येथील खाणी सुरू करण्यास वेदांता सज्ज आहे; परंतु खनिजाला बाजारात उचल नाही. गेल्या तीन ई-लिलावांत सुमारे ३५ लाख टन खनिज विक्रीस काढले. (पान २ वर)
खाणी सुरू होण्यात मोठा अडथळा
By admin | Published: September 14, 2015 1:59 AM