शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मल्लिकार्जुन महाविद्यालयाला नॅक परिशीलनात 'ए' श्रेणी,

By समीर नाईक | Published: April 26, 2023 5:35 PM

मल्लिकार्जुन महाविद्यालय नेहमीच होतकरू आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आलेले आहे.

काणकोण: काणकोण येथील ज्ञान प्रबोधिनी मंडळ संचालित श्री मल्लिकार्जुन व श्री चेतन मंजु देसाई महाविद्यालयाने नुकतीच नॅक परिशीलनाची प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यात महाविद्यालयाने 4 पैकी 3.25 गुण मिळवत 'ए' श्रेणी प्राप्त केली. 

मल्लिकार्जुन महाविद्यालय नेहमीच होतकरू आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आलेले आहे.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव झटणारे शिक्षक, सतत कार्यमग्न राहणारा कर्मचारी वर्ग, सर्वांगीण विकासाला नेहमी प्रोत्साहन देणारे प्राचार्य प्रो. डॉ. मनोज कामत व ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष  चेतन देसाई, सचिव मंजुनाथ देसाई, कोषाध्यक्ष राजेंद्र देसाई व कार्यकारी मंडळ आणि शिक्षणाच्या ओढीने या महाविद्यालयात प्रवेश घेणारा प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थी यांच्या बळावर महाविद्यालयाने नॅकच्या पहिल्या परिशीलन प्रक्रियेत 2.81 गुण मिळवत 'ब' श्रेणी मिळवलेली होती. तीच जिद्द कायम राखत, महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास साधत महाविद्यालयाने यंदा 'ए' श्रेणी मिळवण्याचा मान पटकावलेला आहे.

30 व 31 मार्च रोजी महाविद्यालयात प्रत्यक्ष नॅक कमिटीचे सदस्य परीक्षणासाठी आले होते. भारतातील विविध भागांतून आलेल्या या सूज्ञ परीक्षकांनी महाविद्यालयाचे शैक्षणिक कामकाज, कार्यालयीन कामकाज, व्यवस्थापन, महाविद्यालयाची इमारत, विज्ञान प्रयोगशाळा, जिमखाना, उपहारगृह, महाविद्यालयातील सर्व तांत्रिक सुविधा इत्यादींची कसून पाहणी केली. आजी माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर वर्ग, व्यवस्थापन, प्राचार्य, पालक संघ इत्यादींशी संवाद साधत सर्व पातळ्यांवर महाविद्यालयाचे परीक्षण केले आणि बारकाईने सर्व घटकांचा अभ्यास करत महाविद्यालयाला 'ए' मानांकन दिले.