सूरज नाईकपवार / मडगाव
लोकमत न्युज नेटवर्कमडगाव : नातेवाईकांसमवेत आंघोळीला ओहोळात उतरला असता, एकाचा बुडून मृत्यू झाला. गोव्यातील दक्षिण गोव्यातील पाट्टेबाळ्ळी येथे मंगळवारी वरील दुदैवी घटना घडली. कायतान आंतोन फर्नांडीस (४४) असे मयताचे नाव असून, तो आंबेमोल फातर्पा येथील रहिवाशी आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास वेळीप पुढील तपास करीत आहेत.
मंगळवारी दुपारी कायतान हा आपल्या कुटुंबातील काहीजणांसमवेत आंघोळीला गेला होता. एकूण पाचजण होते.आंघोळ करत असताना तो पाण्यात बुडाला. यावेळी अन्यजणांनी मदतीसाठी एकच आक्राेश केला. अखेर बऱ्याच वेळांनतर त्याचा मृतदेह सापडला.
माघाहून १०८ मदत सेवेच्या ॲम्बुलन्सला बोलावून घेउन कायतानला बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृतदेह शवचिकित्सेसाठी येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे.