शिवोली : गोमंतकीय भूमीत उत्पादीत केलेल्या कैऱ्या सर्वप्रथम बाजारात आणण्याचा विक्रम यंदाही समीर धारगळकर यांनी साकारला आहे. ओशेल - शिवोली येथील आंबा व्यवसायिक समीर धारगळकर यांनी शनिवारी बाजारात कैऱ्यांची विक्री केली. शंभर रुपयांना पाच कैऱ्या असा दर होता.
धारगळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या कैऱ्याचे उत्पादन गोव्यातच झाले आहे. यंदाच्या हंगामातील या पहिल्या कैऱ्या आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्वप्रथम कैऱ्या बाजारात घेऊन येण्याची कमाल धारगळकर यांनी केली होता. यंदा थोडा उशीर झाला असे ते म्हणाले. खास करून लोणचे तयार करण्यासाठी या कैऱ्यांचा वापर केला जातो. आत डिसेंबर महिन्याच्या मध्यावर कैऱ्या बाजारात आल्या आहेत. येत्या काही दिवसातच आंबाही बाजारात येईल अशी माहिती समीर धारगळकर यांनी दिली.