शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

Rafale Deal : मनोहर पर्रीकरांना संशयाच्या फेऱ्यात आणणाऱ्या 'त्या' ऑडिओ क्लिपमध्ये आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 2:10 PM

Rafale Deal : राफेल विमान करारवरुन काँग्रेसनं भाजपावर आता 'ऑडिओ बॉम्ब' टाकला आहे. राफेल डीलसंदर्भात काँग्रेसकडून गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित ऑडिओ क्लिप जारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराफेल करारावरुन काँग्रेसचा भाजपावर 'ऑडिओ बॉम्ब'विश्वजित राणे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, राणेंनी आरोप फेटाळलेराफेलच्या सर्व फाईल्स पर्रीकरांच्या बेडरुममध्ये कशा आल्या आणि का आहेत? - काँग्रेस

गोवा - राफेल विमान करारवरुन काँग्रेसनं भाजपावर आता 'ऑडिओ बॉम्ब' टाकला आहे. राफेल डीलसंदर्भातील गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित ऑडिओ क्लिप काँग्रेसकडून जारी करण्यात आली आहे. या क्लिपमुळे राफेल डील प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे.  गोव्याच्या कॅबिनेटमध्ये राफेल खरेदी करारासंदर्भात झालेल्या चर्चेचा हवाला देत काँग्रेसनं गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासहीत मोदी सरकारवर निशाणा साधला. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित स्वरुपात एक ऑडिओ क्लिप काँग्रेसनं ट्विट केला आहे. या ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत काँग्रेसनं मनोहर पर्रीकरांसहीत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राणे म्हणत आहेत की,''राफेलसंदर्भातील सर्व माहिती माझ्या बेडरुममध्ये आहेत. त्यामुळे माझं कोणीही वाकडं करू शकत नाही, असे मनोहर पर्रीकर यांनी म्हटले.'' 

यावरुनच काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवरही पुन्हा निशाणा साधला आहे. पर्रीकरांकडे राफेलची सर्व रहस्यं असल्यानंच मोदी त्यांना घाबरत आहेत का? , असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे. तसंच राफेलच्या सर्व फाईल्स पर्रीकरांच्या बेडरुममध्ये कशा आल्या आणि का आहेत?, अशी विचारणादेखील काँग्रेसनं केली आहे.

(Rafale Deal : 'काँग्रेसनं इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण करू नये')

काँग्रेसनं जारी केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?अज्ञात व्यक्ती : Good Evening सरविश्वजित राणे : बॉस, Good Evening. आज तीन तासांची एक कॅबिनेट बैठक झाली.अज्ञात व्यक्ती : ओके.विश्वजित राणे : ही गोष्ट सीक्रेटच ठेवा... अज्ञात व्यक्ती : हो.. हो..विश्वजित राणे : आज खूप वादावादी झाली, खूपच. नीलेश काब्राल यांनी आपल्या क्षेत्रातूनच अधिक इंजिनिअर घेतले. जयेश साळगांवकर यांना यादी मिळाली. प्रत्येकजण त्यांच्यासोबत वाद घालत आहेत. शिवाय, अद्याप नियुक्ती न झाल्यानं प्रत्येक जण नाराज आहे.  अज्ञात व्यक्ती : ओके.विश्वजित राणे : बापू सुदीन ढवळीकर यांच्यासोबत वाद घालत होते. अज्ञात व्यक्ती : ओके...विश्वजित राणे : आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एक विधान केले. त्यांनी म्हटलं की, राफेलसंबंधित सर्व माहिती माझ्या बेडरुममध्ये आहे. अज्ञात व्यक्ती : काय सांगताय काय तुम्ही?विश्वजित राणे : हो, मी तुम्हाला सांगतोय...

 विश्वजित राणेंचं स्पष्टीकरणया वादावरुन विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर पलटवार केला आहे. काँग्रेसनं जारी केलेली ऑडिओ क्लिप माझी नसल्याचे सांगत राणे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. ''क्लिपमधील संभाषण काँग्रेसकडून चुकीच्या पद्धतीनं समोर आणण्यात आले आहे. या क्लिपची लॅबटेस्ट करावी'',अशी मागणीही राणे यांनी केली. काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे. शिवाय, काँग्रेसनं इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण करू नये, जेणेकरुन कॅबिनेट आणि मुख्यमंत्र्यांमध्ये गैरसमज निर्माण होतील. तसंच मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राफेल डील किंवा यासंदर्भातील कागदपत्रांबाबत कधीही कोणतेही विधान केले नव्हते, असे स्पष्टीकरणही राणे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. दरम्यान,  काँग्रेस सोडून मी भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळेच मला टार्गेट करण्यात येत आहे, असेही राणे यांनी सांगितले.

 

(राफेल प्रकरणात माझ्यावर कुठलाच आरोप नाही; मोदींचं राहुल गांधींना उत्तर)

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी (1 जानेवारी) एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राफेल कराराबाबत प्रतिक्रिया दिली. राफेल प्रकरणात माझ्यावर झालेले आरोप खासगी स्वरूपाचे नव्हते. जे आरोप झाले ते सरकारवर केले होते. संसदेत राफेल करारावर आम्ही उत्तर दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयानंही या प्रकरणात उत्तर दिलं आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतींनीही उत्तर दिलं आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांना जशाच तसं उत्तर दिलं आहे.  

राफेल करारावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावरुन मोदींना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात मोदी सरकारला क्लीन चिट दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही काँग्रेसनं राफेल करारातील भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती.

तसेच सर्वोच्च न्यायालयाला मोदी सरकार फसवत आहेत. खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांनी न्यायालयालाचीच नव्हे तर 130 कोटी जनतेचीही फसवणूक केली आहे. देशातील नागरिकाचा कररूपी पैसा केंद्र सरकार कोणत्या पद्धतीने खर्च करत आहे, याची मागणी सरकारने देणे आवश्यक असल्याचंही काँग्रेसनं म्हटलं होतं.

 

 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरRafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस