वासुदेव पागी, पणजीः रिवोल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख आणि उत्तर गोव्याचे उमेदवार मनोज परब यांची स्वतःची ३.१२ लाख रुपयांची मालमत्ता असल्याची त्यांनी निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यांच्या पत्नी वीणा यांच्याकडे १.८० लाख रुपयांची मालमत्ता असल्याचेही परब यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
रिव्होल्युशनरी गोवन्सचे उमेदवार मनोज परब यांनी उत्तर गोव्यासाठी आपला अर्ज सादर केला आहे. आपल्या असंख्य समर्थकांसह ते अर्ज सादर करण्यासाठी आले होते. त्यांनी सादर केलेल्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या बँक खात्यात १ लाख ३२ हजार ६४९ रुपये आहेत असे म्हटले आहे. तसेच त्यांच्याकडे ३० हजार रुपये रोख रक्कम असल्याचेही म्हटले आहे. त्यांच्या पत्नी वीणा यांच्याकडे १.७० लाख रुपये किंमतीचे दागिने आहेत तर १० हजार रुपये रोख रक्कम आहे असे असाही प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. मनोज परब यांच्याकडे एक कार आणि एक दुचाकी आहे. दोघांच्या नावे कोणत्याही बँकेत अथवा पतसंस्थेत कर्ज नाही असेही स्पष्ट. क रण्यात आले आहे.
मनोज परब यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गोवा विद्यापीठात जिओलोजी या विषयातून त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांच्या विरोधात एकूण ५ गुन्हे नोंद आहेत. मात्र हे सरव गुन्हे सार्वजनिक मुद्यांवर केलेल्या आंदोलनांशी संबंधित आहेत. त्यात वाळपई पोलीस स्थानकात २ गुन्हे, पणजी, फोंडा आणि म्हापसा पोलीस स्थानकातही प्रत्येकी एक गुन्हा आहे. सर्व प्रकरणात न्यायालयात खटलेही सुरू आहेत.