शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

गोव्यात मराठीलाही राजभाषेचे स्थान

By admin | Published: August 12, 2016 6:12 PM

गोव्यात कोंकणीबरोबरच मराठीलाही राजभाषेचे स्थान द्यावे, असा डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी मांडलेला ठराव विधानसभेत शुक्रवारी संमत झाला

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 12-  गोव्यात कोंकणीबरोबरच मराठीलाही राजभाषेचे स्थान द्यावे, असा डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी मांडलेला ठराव विधानसभेत शुक्रवारी संमत झाला. मात्र सरकारने या विषयात उचित लक्ष घालून व जनतेकडे विचारविनिमय करूनच कायद्यात योग्य ती दुरुस्ती करावी, असेही या ठरावाद्वारे ठरले आहे.सावळ यांच्या ठरावास ही दुरुस्ती पणजीचे भाजप आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी मांडली होती. तीही मंजुर झाली. सरकारने गोवा राजभाषा कायदा 1987 मध्ये त्वरित दुरुस्ती करून मराठीला देखील राजभाषेचा दर्जा बहाल करावा, अशी सावळ यांची मागणी होती. त्यावर सभागृहात दोन्हीबाजूंनी बरीच चर्चा झाली. भाषेच्या विषयावरून वाद नको, सावळ यांनी अगोदर विधानसभेतील सर्व मराठीप्रेमी आमदारांशी चर्चा करायला हवी होती, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले. तसेच हा ठराव संमत करून घेण्यास आपली काहीच हरकत नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तत्पूर्वी राजभाषा खात्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी सावळ यांच्या ठरावाला उत्तर देताना प्रशासकीय कामांमध्ये मराठी वापरली जात असून सरकार त्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे व मराठीच्या उत्कर्षासाठी पुस्तक प्रकाशनासह अनेक योजना सरकार राबवत असल्याचे सांगितले. तुम्ही ठराव मागे घेणार काय अशी विचारणा सभापती अनंत शेट यांनी आमदार सावळ यांच्याकडे केली, त्यावेळी सावळ यांनी नकार दिला. तुम्ही ठराव फेटाळला तरी, चालेल पण आपण मागे घेणार नाही, कारण मराठी राजभाषा व्हावी ही गोव्यातील सर्व मराठीप्रेमींची मागणी व भावना आहे व तिच आपण सभागृहात मांडली असल्याचे सावळ म्हणाले. तत्पूर्वी अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी ठरावास विरोध करणारे भाषण केले. गोवा म्हणजे कोंकणी असून मराठीला राजभाषा केल्यास महाराष्ट्रासह परप्रांतीयांना येथील सरकारी नोक:या खुल्या होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. बाणावलीचे आमदार कायतू सिल्वा यांनीही मराठीला राजभाषा करण्यास विरोध केला. मात्र दुरुस्तीसह ठराव संमत झाला तेव्हा कुणीच विरोध केला नाही. कुणी मत विभाजनही मागितले नाही. सर्वानुमते ठराव मंजुर झाला. म.गो.चा पाठींबाम.गो. पक्ष भाजपसोबत सत्तेत असला तरी, मगोचे आमदार लवू मामलेदार यांनी सावळ यांच्या ठरावास आपल्या पक्षाचा पूर्ण पाठींबा असल्याचे सांगितले. मराठी राजभाषा व्हायला हवी, असे ते म्हणाले. उपसभापती विष्णू वाघ व भाजपचे सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनीही मराठी राजभाषा व्हायला हवी असाच युक्तीवाद केला. मराठीची अवहेलना करू नका, मराठी ही महाराष्ट्राचीच नव्हे तर पूर्णपणो गोव्याचीही आहे, असे वाघ व फळदेसाई म्हणाले. मी कोंकणीत बोलतो पण मराठी राजभाषा व्हावी असे म्हणतो याला ऐतिहासिक कारणो आहेत. गोवा राजभाषा कायद्यानुसार कोंकणी ही राजभाषा असली तरी, ती देवनागरी कोंकणी आहे. गोव्यातील बहुजन समाज जी कोंकणी बोलतो व लेखनात जी वापरली जाते ती भीन्न आहे. ािस्ती आमदारांना ती वाचताही येत नाही. पहिली मराठी महिला नाटककार गोव्यातच झाली. पहिले संगीत मराठी नाटक गोव्यात तयार झाले. गोव्याच्या मराठीने महाराष्ट्राला अनेक नाटककार, संतकवी, साहित्यिक दिले. मराठी ही महाराष्ट्रातून गोव्यात आलेली नाही. ािस्ती मिशन:यांनी देखील गोव्यात आल्यानंतर मराठीतूनच कार्य सुरू केले होते, कारण त्यावेळीही तिच भाषा वापरात होती. गोव्यात काहीजणांकडून मराठीचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न होतो, असे वाघ म्हणाले. गोमंतकीयांच्या राष्ट्रीयत्वाचा :हास पोतरुगीज काळात कसा झाला ते मराठीस विरोध करणा:या कायतू सिल्वासारख्या आमदाराने जाणून घ्यावे, असेही वाघ म्हणाले.