शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

मडगावच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दरदिवशी एक लाखाचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 3:52 PM

 मडगावात  दरदिवशी  चाळीस टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.

मडगाव: आतार्पयत  मडगाव पालिकेसमोर अनंत अडचणी निर्माण केलेल्या  कचरा समस्येने आता आणखी एक मोठी समस्या निर्माण केली असून यापुढे मडगाव पालिकेला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी  दररोज एक लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे दरमहा पालिकेला किमान तीस लाखांचा फटका बसणार आहे. कचरा समस्येचा हा वाद दक्षिण गोवा सत्र न्यायालयासमोर पोहोचला असता पालिकेनेच स्वताहून कचरा प्रक्रियेसाठी दरदिवशी एक लाख रुपये फे डण्याचे मंजूर केले आहे. मडगावात  दरदिवशी चाळीस टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.  मात्र ही प्रक्रिया करणा:या फोमेंतो ग्रीन कंपनीने  मडगाव पालिकेकडून वेळेवर पैसे फेडले जात नाहीत असा दावा करुन  हा प्रक्रिया प्रकल्प बंद करण्याची नोटीस पालिकेला यापूर्वी दिली होती. 9 ऑगस्ट नंतर  मडगावातील कचरा प्रक्रियेसाठी स्वीकारला जाणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर हा वाद न्यायालयात पोहचल्यानंतर  31 ऑगस्टर्पयत प्रक्रिया करण्याचे काम चालू ठेवावे असा आदेश न्यायालयाने दिला होता. आता आज जारी केलेल्या आदेशाप्रमाणो ही कचरा प्रक्रि या 30 सप्टेंबर र्पयत  चालू रहाणार आहे. मडगावची कचरा समस्या ही मडगाव पालिकेसाठी एक डोकेदुखी ठरली असून आतार्पयत  शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चार आस्थापनांचा वापर करुनही मडगाव पालिकेला अपेक्षित यश आलेले नाही. या पाश्र्वभूमीवर आता  नागरिकही  मडगाव पालिकेला लक्ष्य करत असून आतार्पयत  पालिकेने सोनसडय़ावर प्रयोग करुन  करदात्यांचे करोडो रुपये पाण्यात घालवले. त्यामुळे या पालिकेला आता आणखी प्रयोग करण्यासाठी नागरिकांना पिळता येणार नाही अशी प्रतिक्रिया मडगावातील नागरिक नवीन रायकर यानी व्यक्त केली आहे.  मडगावच्या या ज्वलंत समस्येकडे सरकारनेही दुर्लक्ष केले असून या समस्येवर तोडगा काढा अशी मागणी मडगाव पालिकेने मुयमंत्र्यांकडे करुनही अजुन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पाऊले उचलली गेली नाहीत. त्यामुळे सरकारचेही मडगावकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना कित्येक मडगावकरांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :goaगोवाMuncipal Corporationनगर पालिका