- नारायण गावस
पणजी: माशेल महिला सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांची १८ कोटींची फसवणूक केल्याने पैसे परत करावे, अशी मागणी ठेवीदारांनी पणजी आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेऊन केली. माशेल महिला सहकार पतसंस्थेच्या ठेवीदारांनी २०१९ पासून भरलेले पैसे २०२४ झाले तरी अजून मिळाले नाही. अध्यक्ष तसेच संचालकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना कर्ज दिले त्याची परतफेड केली नसल्याने पतसंस्था बुडाली आहे. आम्हाला आपचे पैसे पाहिजे. सरकारने याची कायदेशीर चाैकशी करुन आमचे कष्टाचे पैसे आम्हाला मिळवून द्यावे, असे या ठेवीदारांनी सांगितले.
आम्ही आमचे कष्टाचे पैसे या बॅँकमध्ये भरले होते. आम्हाला आमच्या पैसे प्रत्येक वर्षी दहा टक्क्यांनी वाढ करुन देणार असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही आमचे पैसे भरत गेलो. पण अध्यक्ष तसेच पतसंस्थेच्या संचालक मंडळाने आपल्या नातेवाईकांना तसेच जवळच्या लोकांना मिळेल तसेच कर्ज देत गेले पण या कर्जाची परत फेड केली नाही. तसेच ते परत फेडसाठी जाता नाही आम्हाला परतफेडसाठी जाण्यास सांगितले जाते. या पतसंस्थेची पूर्ण चाैकशी करावी तसेच ज्या लाेकांना या संचालक मंडळाने कर्ज दिले आहे. त्यांच्याकडून हे पैस वसूल करुन आम्हाला द्यावे, असेही या ठेवीदारांनी सांगितले.
जवळपास पाचशेवर तरी या पतसंस्थेचे ठेवीदार आहेत. त्यांच्याकडून जवळपास १८ काेटी भरण्यात आले आहे. काही जणांचे १ काेटींवर ठेवी आहे. अनेक लाेक ज्येष्ट तसेच महिला आहेत. पैसे भरतेवेळी कुठेच वाटले नव्हते की आम्ही अशा प्रकारे बुडले जाणार आहाेत म्हणून. औषधासाठी तसेच मुलांचा शिक्षणाचे पैसेही भरले आहे आता आम्ही पूर्णपणे कंगाल आहोत. आम्हाला आमचे पैसे परत करावे अशी मागणी या ठेवीदरांनी केली आहे.