वास्को: मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष लीयो रॉड्रीगीस यांनी सोमवारी (दि.३) दुपारी आपल्या पदाचा राजीनामा पालिका संचालक कार्यालयात सुपूर्द केला. मुरगाव नगरपालिकेच्या सत्ताधारी गटातील नगरसेवकात झालेल्या अलिखीत करारानुसार लीयो रॉड्रीस यांच्या नगराध्यक्ष पादाची एक वर्षाची कार्कीद पूर्ण झाल्याने त्यांने दुसऱ्या नगरसेवकाला नगराध्यक्ष बनण्याकरिता वाट मोकळी करण्यासाठी पदाचा राजीनामा दिला. रॉड्रीगीस यांनी राजीनामा दिल्याने पुढचा नगराध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांचे समर्थन असलेले नगरसेवक गीरीश बोरकर यांना नगराध्यक्ष बनवण्याची तयारी केल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
२७ जून २०२२ रोजी लीयो रॉड्रीगीस यांची मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली होती. सत्ताधारी गटातील नगरसेवकात झालेल्या अलिखीत करारानुसार लीयो रॉड्रीगीस यांची नगराध्यक्ष पदाची एका वर्षाची कार्कीद थोड्याच दिवसापूर्वी पूर्ण झाली. रॉड्रीगीस यांची नगराध्यक्ष पदाची एका वर्षाची कार्कीद नुकतीच पूर्ण झाल्यानंतर सोमवारी दुपारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र पालिका संचालक कार्यालयात सुपूर्द केले. नगराध्यक्ष रॉड्रीगीस यांनी सुपूर्द केलेले राजीनामापत्र त्यांनी सात दिवसात मागे घेतले नसल्यास ते मान्य करून नंतर पालिकेचा नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी पालिका संचालक कार्यालयाकडून तारीख निश्चित करण्यात येईल. लीयो रॉड्रीगीस यांनी नगराध्यक्ष म्हणून एका वर्षात मुरगाव नगरपालिकेच्या हीताच्या दृष्टीने अनेक उत्तम कामे केलेली आहेत. वास्को शहरातील भाजी मार्केटात आणि अन्य ठीकाणी करण्यात येणाऱ्या अतिक्रमणाविरुद्ध नगराध्यक्ष रॉड्रीगीस यांनी कारवाई करण्यासाठी पावले उचलून एका वर्षात अनेकवेळा अतिक्रमणे हटवलेली आहेत. तसेच त्यांनी मुरगाव नगरपालिकेच्या हीतासाठी आणि पालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या हीतासाठी अनेक उत्तम पावले उचललेली आहेत.
नगराध्यक्ष लीयो रॉड्रीगीस यांनी पदाचा राजीनामा देणारे पत्र पालिका संचालक कार्यालयात सुपूर्द केल्याने मुरगाव पालिकेचा पुढचा नगराध्यक्ष कोण बनणार त्याबाबत चर्चा व्हायला सुरवात झाली आहे. सत्ताधारी गटातील नगरसेवकात झालेल्या अलिखीत करारानुसार पुढचा नगराध्यक्ष बनण्याचा मान नगरसेवक गीरीश बोरकर यांना मिळणार असल्याची चर्चा चालू आहे. नगरसेवक गीरीश बोरकर आमदार कृष्णा साळकर यांचे खास समर्थक असून त्यांना बिनविरोध नगराध्यक्ष बनवण्यासाठी सर्व प्रकारची तयारी चालू असल्याची माहीती सूत्रांनी दिली. येणाऱ्या दिवसात लीयो रॉड्रीगीस यांनी दाखल केलेला राजीनामा मान्य झाल्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी बैठक घेण्याकरिता तारीख निश्चित करण्यात येईल. पुढचा नगराध्यक्ष गीरीश बोरकर बनणार हे एकंदरीत निश्चित झाले असलेतरी पुढचा नगराध्यक्ष कोण ते जाणण्यासाठी मुरगाव पालिकेची निवडणूक बैठक होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.