शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

प्रश्नांच्या भडिमारामुळे बैठक आटोपती

By admin | Published: September 28, 2015 3:04 AM

मडगाव : रिझर्व्ह बँकेने कर्ज मंजुरीला बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर द मडगाव अर्बन को-आॅप. बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भागधारकांच्या प्रश्नांच्या

मडगाव : रिझर्व्ह बँकेने कर्ज मंजुरीला बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर द मडगाव अर्बन को-आॅप. बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भागधारकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे केवळ पाऊण तासामध्ये आटोपती घेण्यात आली. बॅँकेच्या संचालक मंडळाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याच्या कारणावरून राजेंद्र देसाई या एका भागधारकाने सभात्याग केला. एकूण ५३,९९३ भागधारक असलेल्या या बॅँकेचे रविवारच्या सभेत केवळ ९0 भागधारक हजर होते. सरकारने खनिज व्यावसायिकांना दिलेल्या कर्जाची वसुली केवळ सरकारच्या हस्तक्षेपामुळे अडून पडली आणि यामुळेच बॅँक तोट्यात गेली असल्याचे बॅँकेचे अध्यक्ष रमाकांत आंगले यांनी भागधारकांना सांगितले. खनिज व्यावसायिकांना एकूण ४६ कोटी कर्ज दिलेले असून एप्रिल २0१६ पासून नियमानुसार त्याची वसुली केली जाईल, असे स्पष्ट केले. अरविंद होडारकर व म्हाळू नाईक यांनी बँक तोट्यात चालत असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. २0१३-१४ वर्षात २७0.२५ लाख तर चालू वर्षात हा आकडा १२५६.२४ लाख एवढा आहे, याकडेही या भागधारकानी संचालक मंडळाचे लक्ष वेधून त्याचे स्पष्टीकरण मागितले. बँकेचे माजी संचालक मंडळाचे पदाधिकारी आयवो कुतिन्हो यांनी खातेधारक मोठ्या प्रमाणात कायम ठेवी काढू लागले आहेत, याबद्दल प्रश्न उपस्थित करताना अशीच स्थिती राहिल्यास दोन वर्षांत ही बँक बंद होईल, अशी भीती व्यक्त केली. शहरातील बृंदन सभागृहात बॅँकेचे अध्यक्ष रमाकांत आंगले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बँकेने खनिज व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात कर्जे दिली होती. मात्र, राज्यातील खनिज व्यवसाय बंद पडल्याने या व्यावसायिकांकडून कर्जांची परतफेड होऊ शकलेली नाही. थकीत कर्जांच्या रकमेचा आकडा दिवसागणीक फुगू लागला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एनपीए मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कर्ज वसुली थकल्याने रिझर्व्ह बँकेने नवी कर्जे मंजूर करण्यास बंदी घातली आहे. मडगाव अर्बन बँकेच्या एकूण व्यवहारांची खास हिशेब तपासणी केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने नवी कर्जे मंजूर करण्यास बंदी घातली आहे. कर्ज मंजूर करताना बँकेने आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने मोठ्या प्रमाणात कर्ज वसुली होऊ शकलेली नाही, असे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. या बैठकीला को-आॅपरेटिव्ह सोसायटीचा प्रतिनिधी तसेच सीएही नसल्याने बॅँक पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. (प्रतिनिधी)