लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे : मांद्रे पोलिस स्थानकात जर काही गैरसोयी असतील, तर त्याची माहिती पोलिस निरीक्षकांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे का? असा सवाल गृहमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थित केला. पोलिस स्थानकात भेडसावणाऱ्या समस्या लवकर सोडवू, असेही त्यांनी सांगितले.
मांद्रे उदरगत संस्थेने आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाला मुख्यमंत्री सावंत आले असता त्यांना मांद्रे पोलिस स्थानकातील गैरसोयींबाबत प्रश्न विचारला असता ते बोलत होते.
मांद्रे मतदारसंघात स्वतंत्र पोलिस स्थानक उभारण्यासाठी आमदार जीत आरोलकर यांनी सरकार दरबारी जोरदार प्रयत्न केले होते. त्यानुसार मांद्रे मतदारसंघातील किनारपट्टीचा पर्यटन हंगाम आणि इतर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे पोलिस स्टेशन महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे सरकारनेही या ठिकाणी मांद्रे जुनसवाडा येथे आपत्कालीन सेवा इमारतीमध्ये हंगामी स्वरूपाची जागा घेऊन पोलिसस्थानक सुरू केले. त्याचवेळी मुख्यमंत्री सावंत यांनी वर्षभरात नवीन इमारत उभारून पोलिस स्थानकाची सोय केली जाईल, अशी ग्वाही दिली होती; परंतु ज्या ठिकाणी पोलिस स्टेशन आहे त्या ठिकाणी पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांना कसल्याच प्रकारच्या सुविधा नाहीत, कॅन्टीनची सोय नाही, वाहनव्यवस्था नसल्यामुळे घटनास्थळी पोलिस कसे पोहोचणार? यावर कधीतरी गृहखात्याने लक्ष दिले आहे का? असा सवाल उपस्थित केला.
रवींद्र भवन लवकरच मुख्यमंत्री सावंत यांनी दीपोत्सवाच्या निमित्ताने मांद्रे उदरगत संस्था आमदार जीत आरोलकर यांच्या सहकार्यातून भव्य दीपोत्सवाचे आयोजन खाजनगुंडो येथे केले होते. हा उत्सव पेडणे तालुक्यातील आणि पर्यायाने मांद्रे मतदारसंघातील वेगवेगळ्या बालकलाकार युवा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देताना त्या ठिकाणी त्याची सांस्कृतिक कार्यक्रमाचे नृत्याचे कार्यक्रम आयोजित करून व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.
रवींद्र भवन लवकरच
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, रवींद्र भवनासाठी जागा निश्चित झाली. असून आमदार जीत आरोलकर त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. आणि ते लवकरच रवींद्र भवन बालकलाकरांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पेडणे तालुक्यातील सर्व कलाकारांना रवींद्र भवन मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येईल. जे नवोदित कलाकार आहेत, त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र विभाग उभारले जातील. यासंदर्भात कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांचेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.