लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव: म्हादई अभयारण्य क्षेत्रात पेटलेला वणवा विझता विझेना. वन खात्याचे कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. पण, वाढलेल्या उष्म्यामुळे व अवघड डोंगर जंगल प्रदेशामुळे आग विझविण्यास मर्यादा येत आहेत.
आज साट्रे गावापासून चिखली सीमेच्या नजीक आगीचा नव्याने वणवा पेटला आहे. तसेच म्हादई अभयारण्यातील 'झाडांनी' या ठिकाणीसुद्धा आज नव्याने आग लागली. परंतु झाडांनी येथील आग वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे विझविली आहे.
वनमंत्र्यांच्या कडक इशाऱ्यानंतरसुद्धा आगी लागण्याचे प्रमाण सत्तरी तालुक्यामध्ये काही कमी होत नाही. एकूणच आग प्रकरणांमध्ये वन खात्याचे कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी संभ्रमात पडले आहेत. आग नक्की कशामुळे लागते व कोण लावतो हे मोठे कोडे आहे. साट्रे, सुर्ल नदीच्या बाजूने लागलेली आग अजून धुमसत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"