पणजी : न्यायालयाने दोषी घोषित करून ६ महिने तुरुंगवास ठोठावण्यात आलेले माजी मंत्री मिकी पाशेको अटक चुकविण्यासाठी अज्ञातवासात गेले आहेत; परंतु आता तुरुंगवासापासून वाचायचे असेल, तर देश सोडण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहिला नसल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.तुरुंगवासाच्या शिक्षेपासून स्वत:ला वाचविण्याच्या किंवा ही शिक्षा शिथिल करून घेण्याच्या पाशेको यांच्या सर्व वाटा आता बंद झाल्या आहेत. राज्यपालांकडे माफीसाठी अर्ज करण्याची संधीही अत्यंत धूसर झाली आहे. पाशेको यांनी ज्या वीज कर्मचाऱ्याच्या थोबाडीत मारले होते, त्या कपिल नाटेकर यांच्याकडे हे प्रकरण मागे घेण्यासाठी चालविलेली खटपटही फुकट गेली आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत अटक चुकवित असलेले मिकी आणखी किती काळ लपून राहणार, हा प्रश्न आहे; कारण त्यांच्यासमोर अडचणींचे डोंगर वाढले आहेत. त्यांची बँक खाती गोठविण्यात आल्यामुळे आर्थिक नाड्याही आवळल्या आहेत. अशा परिस्थितीत फार काळ अज्ञातवासातही राहणे परवडणारे नाही. त्यांना खरोखरच तुरुंगवास चुकवायचा असेल, तर देश सोडून पलायन करणे हाच पर्याय राहिला आहे.(पान २ वर)
देश सोडण्याचाच मिकींसमोर पर्याय!
By admin | Published: May 19, 2015 1:26 AM