पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणातील संशयित माजी बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्या कर सल्लागाराजवळ कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे गुन्हे अन्वेषण विभागाला (क्राईम ब्रँच) शनिवारी सापडली आहेत. चर्चिल, त्यांचे पुत्र सावियो आणि पत्नी फातिमा आलेमाव यांच्या नावावर ही मालमत्ता आहे. बँक खात्यांची माहितीही सापडली आहे. चर्चिल यांचे वास्को येथील कर सल्लागार दयेश नाईक यांच्या कार्यालयावर छापा टाकून ही कागदपत्रे गुन्हे अन्वेषणने जप्त केली. वास्को येथील लक्ष्मी प्रिंटिंग प्रेसच्या समोरील इमारतीत पहिल्या मजल्यावर नाईक यांचे कार्यालय आहे. तेथे गुन्हे अन्वेषणने शनिवारी सकाळी छापा टाकला. अनपेक्षितपणे पडलेल्या छाप्यामुळे या कार्यालयातील कर्मचारी गोंधळून गेले. टेबलवरच्या एका कागदालाही हात न लावता बाजूला जाण्याचे आदेश पोलिसांनी सर्वांना दिले. त्यानंतर त्यांनी झडती सुरू केली. झडतीत त्यांना मालमत्तेची कागदपत्रे सापडली. त्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता चर्चिल व त्यांचे पुत्र सावियो, पत्नी फातिमा यांच्या नावांवर असलेली कागदपत्रेही सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. सावियो यांच्या नावावरील मित्सुबिशीची महागडी पजेरो गाडीची कागदपत्रेही मिळाली. ही गाडी त्यांनी त्यांचे कर सल्लागार दयेश नाईक यांना भेट म्हणून दिली होती. (पान २ वर)
चर्चिल कुटुंबीयांचे कोट्यवधीचे घबाड
By admin | Published: September 13, 2015 2:59 AM