पणजी : आपल्याला कोणते खाते मिळेल, याबाबत अनेक मंत्री अजूनही संभ्रमात आहेत. आपल्याला कोणते अतिरिक्त खाते मिळेल, याची कल्पना मंत्र्यांना नाही, तर नव्यानेच शपथ घेतलेले दोन मंत्रीही त्यांना कोणते खाते मिळेल, हे खात्रीने सांगू शकत नाहीत.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पूर्वीसारखे जलदगतीने निर्णय घेत नाहीत, ते खात्यांचे वितरण करण्याबाबत खूपच विलंब करतात, अशी भावना मंत्र्यांमध्ये आहे. आमदारांना महामंडळांचे वाटप करण्यासही विलंब झाला. अजून काही आमदारांना मंडळे आणि पीडीएसारख्या संस्था मिळालेल्या नाहीत. मंत्रिपद मिळावे म्हणून यापूर्वी लॉबिंग केलेले माजी मंत्री मिलिंद नाईक यांना एखादे महामंडळ देखील मिळेल की नाही, याबाबत आता शंका आहे. त्यांना पीडीए किंवा महामंडळ देण्यास भाजप अनुकूल नाही. हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांचा मंत्रिपदासाठी आग्रह होता; पण त्यांना गोवा औद्योगिक विकास महामंडळ देऊन सरकारने त्यांना शांत केले आहे.(खास प्रतिनिधी)
खात्यांबाबत मंत्री अजूनही संभ्रमात
By admin | Published: April 16, 2017 2:37 AM