पणजी : राज्यातील मंत्री व आमदारांना लोकायुक्त कार्यालयाने येत्या दि. 5 नोव्हेंबर्पयत मुदत दिली आहे. या मुदतीत सर्व आमदार व मंत्र्यांनी लोकायुक्तांच्या कार्यालयाला स्वत:च्या मालमत्तेविषयीची माहिती सादर करणो गरजेचे आहे.पूर्वी आमदारांची मालमत्ता व त्यांच्यावरील कज्रे याविषयीची माहिती सप्टेंबर महिन्यात सादर करावी लागत असे. मात्र दोन वर्षापूर्वी गोवा लोकायुक्त कायद्यात बदल केला गेला व दि. 5 नोव्हेंबरची तारीख निश्चीत केली गेली. ही तारीख येण्यापूर्वीच मंत्री, आमदारांनी मालमत्तेविषयीची माहिती सादर करणो गरजेचे असते. मात्र यावेळी ती सादर न केल्याने लोकायुक्त कार्यालयाने सर्व आमदारांना दि. 5 नोव्हेंबरची मुदत नव्याने आठवण करून दिली आहे.केवळ पाच- सहा मंत्री, आमदारांनी स्वत:च्या मालमत्तेचा तपशील लोकायुक्तांना सादर केला आहे. उर्वरित 34 ते 35 आमदारांनी अजून माहिती दिलेली नाही. वेळेत माहिती सादर न करणा:या आमदार व मंत्र्यांची नावे लोकायुक्तांकडून राज्यपालांना कळविली जात असतात. यापूर्वी दोघे- तिघे आमदार आजाराच्या कारणास्तव वेळेत माहिती सादर करू शकले नव्हते. दि. 5 नोव्हेंबरची तारीख उलटून गेल्यानंतरही माहिती सादर झाली नाही तर त्याविषयीचा अहवाल राज्यपाल राज्यपालांमार्फत विधानसभेलाही पाठवत असतात.दरम्यान, राज्यातील पंच सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, सरपंच, पणजी महापालिकेचे सदस्य व जिल्हा पंचायत सदस्य यांनीही लोकायुक्तांना स्वत:च्या मालमत्तेविषयी माहिती सादर करणो गरजेचे आहे. त्यांच्यासाठीही दि. 5 नोव्हेंबरची तारीख निश्चीत करण्यात आली आहे. माहिती दरवर्षी सादर करावी लागते. गेल्यावर्षी 8क् टक्के पंच सदस्यांनी माहिती सादर केली होती. बहुतेक नगरसेवकांनीही माहिती सादर केली.
मंत्री, आमदारांना लोकायुक्तांची 5 नोव्हेंबर्पयत मुदत, मालमत्तेचा तपशील सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 10:35 PM