शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

गोव्याचे पर्यटन मंत्र्यांचे मिशन 30 टक्के कमिशन; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 4:51 PM

कोरोना संकटकाळात विदेशात नोकरी करुन पोट भरणारे अनेक गोमंतकीय आज गोव्यात परतत आहेत.

मडगाव:  देशा बाहेरून जे खलाशी आणि इतर गोमंतकीय गोव्यात येऊ लागले आहेत त्यांना सक्तीने सशुल्क क्वारंटायन व्हावे लागत आहे. या खलाशाकडून पैसे आकारूनही त्यांना राहण्यासाठी ज्या खोल्या दिल्या जातात त्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने या संबंधीचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे सरकारची नाचक्की होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर तोफ डागली आहे. बाबूंच्या मिशन 30 टक्के कमिशनचा हा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

गोव्यातील भ्रष्ट भाजप सरकारचे पर्यटन मंत्री  बाबू आजगावकर यांच्या 'मिशन ३० टक्के कमिशन" मुळे गोमंतकीय पर्यटक व्यावसायीकांना आपला धंदा चालवणे कठिण झाले असुन, सद्यपरिस्थीतीत आपल्या हॉटेलांची देखभाल करणेही त्यांना जड जात आहे, त्यामुळेच अनेक हॉटेलात कोरोंटायन केलेल्यांना आज त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते विठू मोरजकर यांनी केला आहे. 

कोरोना संकटकाळात विदेशात नोकरी करुन पोट भरणारे अनेक गोमंतकीय आज गोव्यात परतत आहेत. परंतु, गोव्यातील भाजप सरकारने त्यांच्या कडुन शुक्ल वसुल करुन त्यांना खासगी हॉटेलात कोरोटांयन करुन ठेवले आहे. मागील दोन दिवस अश्या काही हॉटेलांतील अव्यवस्थेचे व्हिडीयो समाजमाध्यमांवर झळकले असुन, सदर परिस्थीती ही पर्यटनमंत्र्यांच्या लुटमारीने हवालदिल झालेल्यांची एक झलक आहे असा आरोप विठू मोरजकर यांनी केला आहे. 

गोवा ट्रेव्हल व टुरीजम असोसिएशनने पर्यटन मंत्री बाबू आजगावकर लोकांना लुटत असल्याचा आरोप करून कमिशन गोळा करण्यात पर्यटन खात्यातील एका अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे नावासकट मुख्यमंत्र्याना पत्र लिहीले होते. त्या पत्रातील आरोपांची चौकशी झाली का वा आपल्याला कमिशनचा वाटा मिळत असल्याने मुख्यमंत्र्यानी ते पत्र दडपले हे डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे. 

पर्यटनमंत्री बाबू आजगावकरांना पर्यटन खात्यात भ्रष्टाचाराचा विक्रम केला असुन, सरकारी सेवेत असलेले आपले बंधू डॉ. श्रीकांत आजगावकर, भावजय रश्मी आजगावकर व आपले कुटूंबिय यांना घेऊन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या खर्चाने विदेश वारी करुन त्यांनी सरकारला लुटले आहे असाही आरोप त्यांनी केला.

बाबू आजगावकरांच्या लुटमारीने आज गोव्यातील प्रत्येक पर्यटक व्यावसायीक त्रस्त असुन, टॅक्सीवाले, शॅक व्यावसायीक, गोमंतकीय जीवरक्षक, हॉटेल चालक, इव्हेंट कंपनी त्यांना  शाप देत आहेत.बाबू आजगावकरांना अधिक काळ पदावर ठेवल्यास अखेरची घटका मोजत असलेले पर्यटन क्षेत्र अखेरचा श्वास घेण्यास वेळ लागणार नाही हे भाजप सरकारने लक्षात ठेवावे असे मोराजकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत