पणजी: राज्यातील निर्यात प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी योजने अंतर्गत (एएसआयडीई) केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा गोवा ओद्यौगिक विकास महामंडळा ने (जीआयडीसी) गैरवापर केला असून हा २३ कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत केला.
या घोटाळ्या प्रश्नी सरकारने चौकशी करावी . याविषयी आपण राज्यपाल तसेच मुख्य सचिवांकडे तक्रार सादर केली आहे. राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आलेल्या निधीचा वापर हा कर्ज फेडण्यासाठी तसेच कार गाडया खरेदी करण्यासाठी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
डिमेलो म्हणाले, की केंद्र सरकारने एएसआयडीई या योजनेसाठी निधी राज्य सरकारला १२ कोटींचा निधी दिला होता. व्याज धरुन या निधीची रक्कम वाढली. निर्यातीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी या निधीचा वापर केला जातो. या निधीसाठी राज्य सरकारने केंद्राला वापर प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. मात्र सदर प्रमाणपत्र न देताच या निधी वापर केला. जीआयडीसीने अगोदर १६ कोटींचे कर्ज फेडण्यासाठी व उर्वरीत रक्कम वाहने खरेदी करण्यासाठी वापर केल्याचा आरोप त्यांनी केला.