वास्को: मुरगाव बंदरातून व्यवसाय होताना विविध प्रकारच्या सर्वांत जास्त समस्यांना जर कोणाला सामोरे जावे लागते तर ते मुरगाव मतदारसंघातील नागरिकांना. पूर्वी ‘मुरगाव पोर्ट अथोरेटी’ (एमपीए) ला पूर्णवेळ चेअरमन नसल्याने मुरगाव बंदरामुळे लोकांशी जुळलेल्या समस्या दूर करण्यास अडचण निर्माण व्हायची. आता डॉ. एन विनोदकुमार एमपीए चे पूर्णवेळ चेअरमन म्हणून आल्याने मुरगाव बंदराशी जुळलेल्या विविध समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी व्यक्त केला.
डॉ. एन विनोदकुमार यांनी एमपीएचा चेअरमन म्हणून ताबा स्विकारल्यानंतर नुकतेच आमदार संकल्प आमोणकर यांनी त्यांना भेटून विविध विषयावर चर्चा केली. त्याबाबत माहीती जाणून घेण्यासाठी गुरूवारी (दि.६) पत्रकारांनी आमोणकर यांच्याशी चर्चा केली. मुरगाव बंदरातून व्यवसाय होताना सर्वांत जास्त समस्यांना सामोरे जर कोणाला जावे लागत असल्यास ते मुरगाव मतदारसंघातील नागरिकांना असल्याचे आमोणकर म्हणाले. मालाची हाताळणी होताना प्रदुषण, रस्त्यावर माल पडणे (स्वीलेज) इत्यादी त्रास निर्माण होत असून मुरगाव मतदारसंघात ह्या समस्या जास्त दिसून येतात.
पूर्वी एमपीए ला पूर्णवेळ चेअरमन नव्हता. यापूर्वी असलेल्या एमपीएच्या चेअरमनशी मंगळूर बंदराचा मुख्य ताबा असून मुरगाव बंदराचा त्यांच्याशी अतिरिक्त ताबा असल्याची माहीती आमोणकर यांनी दिली. त्यामुळे येथील समस्या - विविध विषय सोडवण्यासाठी अडचण निर्माण व्हायची. डॉ. एन विनोदकुमार यांना पूर्णवेळ एमपीए चेअरमनपदाचा ताबा दिल्याने त्यांना येथील समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या दूर करण्यासाठी वेळ मिळणार असून नक्कीच ते लोकांच्या आणि मुरगाव बंदराच्या हीतासाठी उचित पावले उचलणार असल्याचा विश्वास आमोणकर यांनी व्यक्त केला.
डॉ. एन विनोदकुमार यांची मी नुकतीच भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केल्याची माहीती आमोणकर यांनी दिली. मुरगाव बंदरातून व्यवसाय होताना प्रदुषण इत्यादी समस्या निर्माण होऊनये यासाठी उचित पावले उचलण्याबाबत त्यांना कळविले असता त्यांनी नक्कीच सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्याव्यतिरिक्त मुरगाव बंदरात भविष्यात नवीन ‘क्रुज टर्मिनल’ येणार असून त्यामुळे निर्माण होणाºया रोजगार संधीचा जास्तीत जास्त फायदा मुरगाव मतदारसंघातील तरुणांना व्हावा यासाठी उचित पावले उचलण्याबाबत त्यांना कळविले आहे. तसेच त्यांच्याशी एमपीएच्या इस्पितळाबाबत, सीएचएलडी कामगारांच्या विषयाबाबत चर्चा केल्याचे आमोणकर यांनी सांगितले.
मुरगाव बंदराशी जुळलेल्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि समाज - जनतेच्या हीतासाठी उचित पावले उचलण्याचे आश्वासन डॉ. एन विनोदकुमार यांनी दिल्याची माहीती आमोणकर यांनी दिली. मुरगाव बंदराने चांगला व्यवसाय करावा, मात्र ते करताना प्रदुषण आणि इतर कुठलीच समस्या लोकांना निर्माण होणार नाही त्याकडे योग्यरित्या लक्ष देण्याबाबत मी त्यांच्याशी चर्चा केल्याचे आमोणकर म्हणाले.