पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोव्यात तिस:या मांडवी पुलाचे उद्घाटन करण्यासाठी गोव्यात येणार नाही हे स्पष्ट झाले आहे. येत्या 26 रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनी गोव्यातील ह्या सर्वात लांबीच्या पुलाचे उद्घाटन करावे, असे गोवा सरकारच्या साधनसुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) ठरवले आहे. मात्र पंतप्रधान त्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाहीत.
पंतप्रधान गोवा भेटीवर येतील तेव्हा नव्या मांडवी पुलाचे आम्ही उद्घाटन करू, असे साधनसुविधा विकास महामंडळाकडून अगोदर सांगितले जात होते. गेल्या 12 जानेवारी रोजी पुलाचे उद्घाटन करावे असे अगोदर ठरले होते. पण प्रत्यक्षात 12 रोजी पुलाचे काम पूर्णच झाले नव्हते. पुलाचे अर्धवट स्थितीत उद्घाटन करून लोकांचा जीव धोक्यात घालू नका, आम्ही उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला होता.
तिसरा मांडवी पुल हा राष्ट्रीय महामार्गावर येतो. एल अँण्ड टी कंपनी ही या पुलासाठी कंत्रटदार कंपनी आहे. या मांडवी पुलाचे हस्तांतरण साधनसुविधा विकास महामंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गोवा विभागाकडे 20 जानेवारीपर्यंत करावे असे अगोदर ठरले होते पण पुलाशीनिगडीत थोडी कामे अजून शिल्लक असल्याने हस्तांतरण झालेले नाही. येत्या दि. 26 र्पयत तरी हस्तांतरण होईल काय असा प्रश्नही काहीजणांना पडला आहे.
पंतप्रधान मोदी हे गोव्यात लोकसभा निवडणुकीच्या काळातही प्रचारासाठी येणार नाहीत. त्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकत्र्याशी संवाद साधला. यापुढे ते उत्तर गोव्यातीलही कार्यकत्र्याशी संवाद साधतील पण ते गोवा भेटीवर येणार नाहीत, अशी माहिती मिळाली.
दरम्यान, जोरदार वाऱ्यांमुळे मांडवी पुलाला भविष्यात त्रस होऊ शकतो, अशा प्रकारचा दावा काहीजणांनी केला तरी, प्रत्यक्षात चेन्नईच्या तज्ज्ञांकडून मांडवी पुलाची विंड टनल चाचणी करून घेतली गेली आहे व त्यामुळे वाऱ्याच्या कारणाने पुलाला कोणतीच समस्या येणार नाही, असे साधनसुविधा महामंडळाच्या अभियंत्यांनी सांगितले.