पणजी: एटीएम हॅकर्सनी पुन्हा एकदा गोमंतकियांना शॉक देताना अनेक जणांच्या खात्यातील पैसे साफ केले. एक्सीस बँकेत खाती असलेल्या ब-याच लोकांच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पैसे एटीएमच्या माध्यमातून काढण्यात आले आहेत आणि मुंबईहून काढले गेले आहेत. एटीएम स्कीमर्स वापरू अगोदर एटीएमची माहिती चोरण्यात आली होती आणि नंतर पैसे काढण्यात आले असेही आढळून आले आहे. ज्या लोकांचे पैसे काढले गेले त्यात काही पोलिसांचाही समावेश आहे. बँकेतील खात्यांची सुरक्षा ही संबंधित बँकेची जबाबदारी असते. त्यामुळे काढले गेलेले पैशांची भरपाई करण्याची जबाबदारी बँकेवर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकांनीही गेलेली रक्कम खातेदारांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पोलीस स्थानकात या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला नाही. काही दिवसांपूर्वी पणजी बसस्थानकाजवळच्या कार्दोजो इमारतीत असलेल्या एक्सीस बँकेच्या एटीएमला कुणी तरी अज्ञाताकडून स्कीमर लावून ठेवल्याची तक्रार अॅड लेकराज माशेलकर यांनी केली होती. होता आणि त्या एटीएममधून त्याने पैसे काढल्यामुळे त्याच्या एटीएम कार्डातील गोपनीय माहिती चोरल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदविला असून तपासही सुरू केला होता. त्या प्रकरणाचा इथे संबंध या प्रकरणाशी संबंध असण्याची शक्यता आहे.
स्किमिंग म्हणजे काय?एटीएम स्किमंिग म्हणजे एटीएम कार्डच्या मागील बाजूने असलेल्या चुंबकीय काळ््या पट्टीतील माहिती विशिष्ठ्य प्रकारचे उपकरण वापरून चोरणे. हे माहिती चोरण्यासाठी वापरले जाणारे उपकरण म्हणजे स्कीमर. स्कीमरचा धोका टाळण्यासाठी लोकांनी सीसीटीव्ही कॅमरे नसलेल्या एटीएमचा वापर करू नये. एटीएम म्शिनमध्ये कार्ड स्वाईप करण्याच्या जागेत नेहमीपेक्षा वेगळेपणा आढळला किंवा काड स्वाईपिंग करण्याच्या जागेत कार्ड घालताना अडचण होत आहे असे वाटू लागल्यास तेथे एटीएमचा वापर टाळावा अशा पोलिसांच्या सूचना आहेत.