वास्को: मुरगाव नगरपालिकेचा कनिष्ठ कारकून (एलडीसी) मिल्टन डीसोझा यांनी पैशांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला पालिका संचालकांनी निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. मिल्टन यांनी बनावट पावती बनवण्याबरोबरच त्याच्यावर बनावट स्टॅम्प मारून आणि लेखा कर अधिकाºयाचे बनावट हस्ताकक्षर करून एका महीलेकडून ३२ हजाराची कर मूल्यांकन रक्कम स्वीकारून पालिकेच्या तिजोरीत जमा न करता हडपल्याचे उघडकीस आले आहे. घर मूल्यांकन रक्कम भरलेल्या त्या महीलेकडून मिल्टनबाबत तक्रार येताच त्याची माहीती मी पालिका संचालकांना दिल्यानंतर त्याला निलंबित केल्याची माहीती मुरगावचे नगराध्यक्ष लीयो रॉड्रीगीस यांनी दिली.
मुरगाव नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेकवेळा पालिकेला त्याचे कर्मचारी - कामगारांचा पगार सुद्धा देण्यास त्रास निर्माण होतानाचे काही महीन्यापूर्वी दिसून आले आहे. पगार वेळेवर देण्यात येत नसल्याने कामगारांना काहीवेळा आंदोलन छेडण्याची पाळी निर्माण झालेली आहे. एका बाजूत मुरगाव नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बरोबर नसून आता मुरगाव नगरपालिकेच्या एका कर्मचाºयाने पैशांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मुरगाव नगरपालिकेत होणाºया कामकाजाबाबत लोकात प्रश्न निर्माण होणे सहाजीकच आहे. मुरगाव नगरपालिकेचे कनिष्ठ कारकून मिल्टन डीसोझा यांना निलंबित करण्याचा आदेश पालिका संचालकांनी मंगळवारी (दि.११) जारी केल्याची माहीती नगराध्यक्ष लीयो रॉड्रीगीस यांनी बुधवारी (दि.१२) दिली. मिल्टन यांनी मुरगाव नगरपालिकेची बनावट पावती तयार करून त्याच्यावर बनावट स्टॅम्प मारून लेखा कर अधिकाºयाचे बनावट हस्ताकक्षर करून एका महीलेकडून ३२ हजाराची रक्कम घेतली. ती रक्कम मिल्टन ने मुरगाव पालिकेच्या तिजोरीत जमा न करता हडप केल्याचे महीलेने तक्रार दिल्यानंतर उघड झाल्याचे रॉड्रीगीस यांनी सांगितले.
मुरगाव नगरपालिकेचा कनिष्ठ कारकून मिल्टन यांनी पैशांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघड होताच त्याबाबतची माहीती मी पालिका संचालकांनी दिल्यानंतर त्यांनी त्याला निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. यापूर्वी अन्य एका प्रकरणात मुरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांनी मिल्टन याला ‘मेमो’ जारी केला असून आता हे नवीन प्रकरण समोर आल्यानंतर त्याला निलंबित केल्याचे लीयो यांनी सांगितले. निलंबनाचा आदेश जारी करण्याबरोबरच मिल्टनला पालिका संचालक कार्यालयात हजेरी लावण्याचे नमूद केले असून ह्या प्रकरणात योग्य चौकशी करून नंतर पुढची कारवाई केली जाणार असल्याचे लीयो यांनी सांगितले.
चुकीच्या मार्गावर जाऊ नकात: नगराध्यक्षांचा उपदेशमुरगाव नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आम्हाला अनेकवेळा कर्मचारी - कामगारांचा पगार सुद्धा घालण्यास त्रास निर्माण होतो असे नगराध्यक्ष लीयो रॉड्रीगीस म्हणाले. मुरगाव नगरपालिकेचा कर्मचारी मिल्टन यांनी पैशांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने लीयो रॉड्रीगीस यांनी खंत व्यक्त करून त्या प्रकरणात योग्य चौकशी आणि उचित कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. मुरगाव नगरपालिकेच्या कुठल्याच कर्मचारी - कामगाराने अशा प्रकारच्या चुकीच्या मार्गावर जाऊनये असा उपदेश नगराध्यक्ष लीयो यांनी यावेळी दिला.