शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सलामीलाच गदारोळ, कामकाज सलग दोनवेळा तहकूब; हक्कभंगाच्या मागणीवरून सत्ताधारी आक्रमक

By वासुदेव.पागी | Published: July 15, 2024 12:54 PM

गोवा विधानसेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होताच हक्कभंगाच्या मागणीवरून कामकाज अर्धा तास तहकूब करावे लागले.

वासुदेव पागी,पणजीःगोवा विधानसेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होताच हक्कभंगाच्या मागणीवरून कामकाज अर्धा तास तहकूब करावे लागले. कॉंग्रेसचे आमदार एल्टॉन डिकॉस्टा यांनी सभापती रमेश तवडकर यांच्या विरुद्ध एसटी राखीवतेच्या ठरावा संदर्भात आक्षेपार्ह भाष्य केल्याचा दावा सत्ताधारी सदस्यांचा होता आणि त्यासाठी एल्टन यांनी सभापतींची माफी मागावी असा आग्रह त्यांनी धरला होता. 

सोमवारी अधिवेशनाची सुरूवात झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आमदार एल्टन यांनी एसटी आरक्षणाच्या संदर्भात खाजगी ठरावाची मागणी सभापतींकडे केली होती. ती मागणी फेटाळल्यामुळे एल्टन यांनी सभापतींविरुद्ध आक्षेपार्ह टीपण्णी केल्याचा दावा आमदार दाजी साळकर यांनी केला. त्यामुळे हा सभापतींचा हक्कभंग ठरतो असा त्यांचा युक्तिवाद होता. या कारणामुळे एक तर एल्टन यांनी सभापतींची माफी मागावी किंवा सभापतींनी एल्टन यांच्या विरोधात हक्कभंगाची कारवाई करावी अषी साळकर आणि इतर सत्ताधारी सदस्यांची मागणी होती. 

यावर आमदार एल्टन तसेच इतर विरोधी सदस्यांनी माफी मागण्यास नकार दिला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव उभे राहून त्यांनी सांगितले की ही हुकूमशाही असून कोणत्याही प्रकारे माफी मागितली जाणार नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपल्या मागणीचा आवाज चढवीत गदारोळ केला. सभापती रमेश तवडकर यांनी सभागृह अर्ध्यातासासाठी तहकूब करण्यात जाहीर केले.  तहकूबी संपवून पुन्हा कामकाजाला सुरूवात झाली तेव्हा विरोधीपक्षनेते युरी यांनी याप्रकरणात पुन्हा एकदा एल्टन डिकॉस्टा यांचे समर्थन करताना त्यांनी माफी मागण्याचा प्रश्नत उद्भवत नाही असे सांगितले आणि माफी मागण्यास साफ नकार दिला. त्यामुळे पुन्हा गरारोळ झाला आणि पुन्हा एकदा कामकाज तहकूब करण्यात आले.

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारmonsoonमोसमी पाऊस