पणजी : मोपा येथील मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट देशातील पहिले हरित प्रमाणित विमानतळ टर्मिनल ठरले आहे. ग्रीन न्यू बिल्डिंग रेटिंग प्रणाली अंतर्गत इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे प्लॅटिनम रेटिंग मिळवणारे देशातील ते पहिले विमानतळ टर्मिनल बनले आहे, असल्याचे भारतीय उद्योग महासंघाने म्हटले आहे.
ऊर्जा आणि पाण्याचे संरक्षण करून आणि कचरा कमी करून नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यासाठी अनेक शाश्वत वैशिष्ट्ये हाती घेतल्याने ‘मोपा’ला हे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमानतळाचे गेल्या रविवारी ११ रोजी उद्घाटन केले. येत्या ५ जानेवारीपासून व्यावसायिक विमानांचे प्रत्यक्ष उड्डाण सुग़ होणार असून वर्षाकाठी ४४ लाख प्रवाशी हाताळण्याची या विमानतळाची क्षमता आहे.