पणजी: म्हादईचा पाणी प्रश्नी गोवा- कर्नाटक वाद चालू असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत काल कर्नाटकात भाजपच्या विजय संकल्प यात्रेत सहभागी झाले. कर्नाटकातील जनता सर्वांगीण विकासाचा संकल्प पुढे नेताना भाजपला १५० हून अधिक जागांवर विजयी करील, असा दावा यावेळी सावंत यांनी बोलताना केला.
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी येत्या मेपूर्वी निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने भाजपने तेथे प्रचाराचा जोर लावला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी रविवारी दक्षिण कर्नाटकात बेल्थांगडी येथे विजय संकल्प यात्रेत भाग घेतला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री ईश्वराप्पा तसेच इतर यावेळी उपस्थित होते.
प्रचारसभेत सहभागी झाल्यानंतर ट्विट करताना सावंत यांनी असे म्हटले आहे की, 'तेथील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून मी भारावून गेलो. केंद्रात मोदीजी आणि राज्यात बोम्मई मिळून डबल इंजिन सरकारने केलेल्या विकासावरून भाजप कार्यकर्ते उत्साहित आहेत. ' दरम्यान, कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविल्याने आधीच गोमंतकीयांमध्ये नाराजी आहे. कळसा भंडरा प्रकल्पासाठी डीपीआरला दिलेली मंजुरी मागे घ्यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"