वास्को: मुरगाव पालिकेची अनेक वर्षापासून राहिलेली ४० कोटी रुपयांची थकबाकी वसुली करण्यासाठी नवीन नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांनी कडक पावले उचललेली आहेत. पालिका हद्दीतील व्यापाऱ्यांनी तसेच घरमालकांनी अनेक वर्षे घरपट्टी न भरल्याने ही रक्कम २ कोटी ९८ लाख रुपयापर्यंत पोहोचली आहे. ज्या घरमालकांची घरपट्टी १० हजाराहून जास्त थकबाकी आहे त्यांना नोटीसा जारी करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेला दहा हजाराहून जास्त घरपट्टी थकबाकी देणा-यांची अजून फक्त दोनच प्रभागातील यादी तयार करण्यात आलेली असून ह्या यादीत १०० जणांची नावे समोर आल्यानंतर त्यांनी सदर थकबाकी १५ दिवसाच्या आत भरण्याची नोटीस तयार केली असून लवकरच त्यांना पाठवण्यात येणार आहे.
क्रितेश गावकर यांनी नगराध्यक्ष म्हणून मुरगाव नगरपालिकेचा ताबा घेतल्यानंतर मागच्या अनेक वर्षापासून राहीलिली विविध थकबाकी वसूल करण्याच्या कामाला त्यांनी सुरवात केली आहे. मार्च २०१८ पर्यंतच्या काळात मुरगाव नगरपालिकेला ४० कोटी रुपये थकबाकी येण्यापासून राहिलेली असल्याची माहीती नगराध्यक्ष गावकर यांनी त्यांना संपर्क केला असता देऊन यात घरपट्टी २ कोटी ९८ लाख, व्यापारी परवाना नूतनीकरण १ कोटी ७७ लाख, पालिका इमारत व दुकानांचे भाडे ३५ कोटी असल्याचे सांगून याबरोबरच अन्य काही थकबाकी राहिलेली असल्याचे सांगितले. सध्या मुरगाव नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे गावकर यांनी सांगून ती सुधारण्याकरीता पालिकेची ४० कोटी रुपये थकबाकी वसूल करण्यासाठी कडकरित्या पावले उचलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांची घरपट्टीची रक्कम १० हजाराहून जास्त झालेली आहे त्यांची यादी तयार करण्यात येत असून ती लवकरात लवकर भरण्यात यावी यासाठी त्यांना नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे गावकर यांनी सांगितले. सध्या पालिकेच्या २५ प्रभागापैंकी दोन प्रभागातील यादी तयार केली असता १०० जणांनी घरपट्टी दहा हजाराहून जास्त पोचली तरी भरलेली नसल्याचे उघड झाल्याचे गावकर यांनी सांगून त्यांना पाठवण्यासाठी नोटीसा तयार करण्यात आल्याचे सांगितले. नोटीसा बजावून सुद्धा पैसे भरण्यात आले नसल्यास पुढच्या टप्यात त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असे गावकर यांनी सांगितले.
ह्या महिन्याचा पगार पालिका कामगारांना देण्यास कठीण होणार अशी चर्चा असल्याने याबाबत गावकर यांना विचारले असता कामगारांचा पगार देण्यासाठी पालिकेकडून वेळेतच अचूक पावले उचलण्यात येणार, अशी माहीती त्यांनी दिली. राहिलेली घरपट्टी थकबाकी वसूल करण्याबरोबरच इतर थकबाकी वसूल करण्यासाठी कडकरित्या पावले उचलण्याबाबत कामाला सुरवात करण्यात आले असल्याचे गावकर यांनी सांगितले. एम.पी.टी चा कचरा उचलण्यासाठी त्यांच्याकडून मुरगाव पालिकेला महिन्याला ४५ हजार रुपये देण्यात येत असल्याची माहिती गावकर यांनी देऊन मागच्या दहा महिन्यापासून याबाबतची पालिकेने बिले तयार केली नसल्याचे त्यांनी सांगितले. सदर रक्कम ४ लाख ५० हजार एवढी झालेली असून ती वसूल करण्यासाठी पालिकेने बिले तयार करण्याच्या कामाला सुरवात केली असल्याचे गावकर यांनी माहीतीत पुढे सांगितले.
पालिकेची राहीलेली ४० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका अधिका-यांची बैठक घेऊन यासाठी कुठल्या प्रकारची पावले उचलवावी याबाबत चर्चा केली असून ती वसूल करण्यासाठी सक्त रित्या कारवाई करण्यात येणार असे गावकर शेवटी म्हणाले.