- सद्गुरू पाटील ।पणजी : गोव्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या कचऱ्याची निर्मिती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख शहरांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराविरुद्ध नगरपालिका व शासकीय यंत्रणेने एकत्रितपणे युद्धच छेडले आहे. दंडात्मक कारवाईही सुरू झाली आहे. पर्यटकांचाही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याकडे कल आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सहा महिन्यांपूर्वी प्लॅस्टिक बंदीची घोषणा केली होती. टप्प्याटप्प्याने बंदी राबविली जाईल, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले होते. त्याच धर्तीवर नगरपालिकांनी आता पणजी, मडगाव आणि म्हापसामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापराविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. या तीन शहरांतील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या कचºयाची निर्र्मिती होते. सायंकाळी प्लॅस्टिकचा कचरा जाळला जातो. त्यामुळे प्रदूषण व पर्यावरणाचीही मोठी हानी होते. राजधानी पणजीत तर प्लॅस्टिकचा कचरा जाळण्याविरुद्ध महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. दुकानदार, मोठे व्यापारी, विक्रेते यांनीही ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्या द्यायच्या नाहीत, अशी भूमिका घेतली आहे.मडगावमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाºया साठपेक्षा जास्त विक्रेत्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली. म्हापशात काही विक्रेत्यांना पालिकेने कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. पणजीत महापालिकेने जागृती मोहीम सुरू केली आहे. मे महिन्यापासून दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे, असे महापौर विठ्ठल चोपडेकर यांनी सांगितले.गोव्यात कठोरपणे प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, यासाठी कार्यवाही सुरू आहे.म्हापशापासून अवघ्या दहा-बारा किलोमीटरवर जगप्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. तेथे येणारे विदेशी व देशी पर्यटक म्हापशातील बाजारपेठेला भेट देतात. पणजीतील बाजारपेठेतही अनेक पर्यटक येतात. बहुतांश प्लॅस्टिक कचरा बाजारपेठेतच तयार होतो, हे सरकारच्या लक्षात आले आहे. यापुढे पाच हजार रुपयांपर्यंत दोषींना दंड ठोठावण्याचा सरकारचा विचार आहे.>प्लॅस्टिक कचºयाविरुद्ध सुरू झालेली मोहीम स्वागतार्ह आहे. प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीची गरज होतीच. प्लॅस्टिकच्या कचºयाचे प्रमाण खूपच कमी होईल. पर्यावरणासाठी हे उपयुक्त ठरेल.- गुरुदास कामत,अध्यक्ष, ईको गोवाप्लॅस्टिकच्या कचºयाविरुद्ध अधिकाधिक जागृती व्हायला हवी. कॅन्सरसारख्या अनेक रोगांचे रुग्ण सर्वत्र वाढत आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक उघड्यावर जाळण्याचा मूर्खपणा कुणी करू नये.- विश्वजीत राणे,आरोग्यमंत्री
गोव्याची प्लॅस्टिकमुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 4:50 AM