लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मुंबई-गोवा 'वंदे भारत' रेल्वेगाडी येत्या २६ पासून सुरू केली जाण्याची शक्यता आहे. गोव्याहून सहा तासांत मुंबईला पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाडीची प्रतीक्षा गोवेकर मोठ्या आतुरतेने करीत आहेत.
३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेगाडीचे व्हर्च्यूअल उद्घाटन करणार होते; परंतु आदल्याच दिवशी ओडिशात तीन रेल्वेगाड्यांचा मोठा अपघात घडल्याने उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले.
दरम्यान, गोवा-मुंबई मार्गाबरोबरच बंगळुरू-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळ- इंदूर व भोपाळ- जबलपूर या रेल मार्गावरही एकाच दिवशी "वंदे भारत' रेलगाड्या सुरू केल्या जातील.