लोकमत न्यूज नेटवर्कवास्को: १५ दिवसापूर्वी आंद्राप्रदेश येथून गोव्यात काम शोधण्यासाठी आलेल्या २७ वर्षीय ताहीर हुसेंन मुल्ला याच्या हातातून नुवे येथे राहणाºया संजीव बोजगर याचा खून घडल्याची माहीती बुधवारी (दि.८) वेर्णा पोलीसांसमोर उघड झाली. ताहीरशी गोव्यात नोकरी नसल्याने तो काही दिवसापासून दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या ‘सबव्हे’ (पादचाºयांना महामार्ग ओलांडण्यासाठी असलेला भूमीगत मार्ग) च्या पायºयात झोपायचा. मंगळवारी उत्तररात्रीनंतर नुवे येथील संजीव बोजगर त्याठीकाणी पोचल्यानंतर कीरकोळ विषयावरून दोघात वाद निर्माण झाल्यानंतर हे प्रकरण मारामारीत बदलले तेव्हा ताहीर ने संजीवला धक्का दिला असता तो पायºयांवरून खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहीती पोलीसांनी दिली.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी उत्तररात्रीनंतर (सुमारे १२.३० च्या सुमारास) ही घटना घडली. आंद्राप्रदेश येथील ताहीर गोव्यात काम शोधण्यासाठी आल्यानंतर मागच्या काही दिवसापासून तो वेर्णा औद्योगिक वसाहतीत असलेल्या टाटयन जंक्शन जवळील ‘सबव्हे’ च्या पायºयांवर झोपायचा. मंगळवारी रात्री तो अशाच प्रकारे पायºयांवर झोपला असता १२.३० च्या सुमारास ५० वर्षीय संजीव बोजगर दुचाकीने तेथे आल्यानंतर त्यांने झोपलेल्या ताहीरला उठविले. संजीव त्याठीकाणी दारूची बाटली घेऊन आला होता अशी माहीती पोलीसांना प्राथमिक चौकशीवेळी प्राप्त झाली. त्यानंतर किरकोळ विषयावरून संजीव आणि ताहीर यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर हे प्रकरण हातापाईवर येऊन पोचले. दोघांनी एकामेकाला मारण्यास सुरवात केल्यानंतर ताहीर ने संजीवला धक्का दिला. पायºयांवर उभा असलेला संजीव धक्का दिल्याने तो खाली पडून त्याचे डोके पायºयांना आपटत तो एकदम खाली पोचला. त्यानंतर ताहीर ने खाली जाऊन संजीवला पाहीले असता त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याचे त्याला आढळून आले. ताहीरने संजीवला फरफटत खेचून बाजूला ठेवून नंतर रात्री तो त्याच ठिकाणी झोपला. बुधवारी सकाळी ताहीर ने उठून संजीव ला पाहीले असता तो मृतअवस्थेत असल्याचे त्याला आढळून आले. आपल्या हातातून खून घडल्याचे ताहीरला समजताच त्यांनी जोरा जोरात रडायला सुरवात केली. त्याचवेळी तेथून वास्को वाहतूक पोलीस स्थानकाचे हवालदार आजाद अहमद आणी होमगार्ड नियाज जात होते. काही कारणामुळे ते ‘सबव्हे’ जवळ थांबले असता त्यांना ताहीर रडत असल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित ताहीरला रडण्याचे कारण विचारले असता ताहीर ने घडलेल्या घटनेची माहीती हवालदार आजाद आणि होमगार्ड नियाज याला दिली. या खून प्रकरणाची माहीती आजाद आणि नियाज यांना मिळताच त्यांनी ताहीरला तेथेच पकडून ठेवून वेर्णा पोलीसांना घटनेची माहीती दिली. पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेतली असता संजीव त्याठीकाणी मृतअवस्थेत पडल्याचे त्यांना आढळून आले. पोलीसांनी त्वरित ताहीर विरूद्ध भादस ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.
तसेच पोलीसांनी मयत संजीय याच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवचिकित्सेसाठी शवगृहात पाठवला असून गुरूवारी त्याच्या मृतदेहावर शवचिकीत्सा केली जाणार आहे. खून झालेला संजीव दुचाकी ‘मेकानिक’ असल्याची माहीती पोलीसांना चौकशीवेळी मिळाली असून तो नुवे येथील एका दुचाकी दुरूस्ती गॅरेजमध्ये काम करायचा. तपासणीवेळी घटनास्थळावरून दारूच्या बाटलीच्या फुटलेल्या काचा पोलीसांना आढळल्याची माहीती प्राप्त झाली आहे. खूनाचे हे प्रकरण घडले त्यावेळी ताहीर दारूच्या नशेत असावा असा संशय व्यक्त केला जात असून पोलीस त्या दिशेने चौकशी करित आहेत. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.
वेळेवरच ते पोचल्याने संशयित खूनी झाला गजाआडड्युटीवर निघालेले वास्को वाहतूक पोलीस हवालदार आजाद अहमद आणि होमगार्ड नियाज त्या ‘सबव्हे’ समोर काही कामासाठी थांबल्याने संजीव बोजगर याच्या खूनाचे प्रकरण उघड झाले. तसेच त्या खून प्रकरणातील संशयित आरोपी ताहीर याला गजाआड करण्यास पोलीसांना सहज यश प्राप्त झाले. आजाद आणि नियाज त्याठीकाणी वेळेवरच पोचले नसते तर कदाचित ताहीर यांनी घटनास्थळावरून पलायन सुद्धा केले असते अन् पोलीसांना या खून प्रकरणातील संशयिताला गजाआड करण्यास कदाचीत बराच त्रास घ्यावा लागता.