माझी उमेदवारी ही अडचणीत आलेल्या सामान्य जनतेची: विरियातो फर्नांडिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2024 09:40 AM2024-04-18T09:40:14+5:302024-04-18T09:43:31+5:30

आपचे वेळ्ळीचे आमदार कॅप्ट वेंझी व्हिएगस, गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर उपस्थित होते.

my candidacy is that of the troubled common man said viriato fernandes | माझी उमेदवारी ही अडचणीत आलेल्या सामान्य जनतेची: विरियातो फर्नांडिस

माझी उमेदवारी ही अडचणीत आलेल्या सामान्य जनतेची: विरियातो फर्नांडिस

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी बुधवारी रामनवमीचे औचित्य साधून दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्वीन ए. चंदू यांच्याजवळ आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई, आपचे वेळ्ळीचे आमदार कॅप्ट वेंझी व्हिएगस, गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर उपस्थित होते.

अर्ज सादर करण्यापूर्वी फातोर्डा येथे दामोदर लिंगावर जाऊन आशीर्वाद घेतला व कपेलमध्ये जाऊन प्रार्थना केली. त्यानंतर काँग्रेस कार्यालयाजवळ इंडिया आघाडीच्या नेत्यांना मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करताना विरियातो फर्नांडिस यांच्या विरोधात राज्य सरकारने खटला दाखल झाला होता याचा आम्हाला अभिमान आहे. लोकांसाठी हक्कासाठी न्यायासाठी झगडणारा उमेदवार इंडिया आघाडीकडून देण्यात आला आहे. पक्ष आणि जनतेलाही अभिमान वाटावा; कारण त्यांनी हा गुन्हा लोकांसाठी आपल्या अंगावर घेतला आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांच्या वरील गुन्हा सार्वजनिक केलेला आहे.

यावेळी गोवा फॉरवर्डचे सरदेसाई म्हणाले की, गोव्यात बेरोजगारी आहे, याची माहिती प्रचारादरम्यान भाजप उमेदवार पल्लवी धेपे यांना लोकांकडून मिळाली आहे. बेरोजगारी हा ज्वलंत प्रश्न राज्यातच नाहीतर संपूर्ण देशात आहे. राज्य सरकार बेरोजगार सुशिक्षित युवकांना नोकऱ्या देण्यास अपयशी ठरले आहे, हे यावरून स्पष्ट होते. येथील पर्यावरण राखण्यासाठी झगडणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी श्रीरामाचे आशीर्वाद असतील. आम्ही खोटे रामभक्त नाहीतर खरे राम भक्त आहोत. कारण, आम्ही रामनवमीच्या दिवशी आमचा उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

वेळ्ळीचे आमदार व्हिएगस यांनी राज्यात सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याने गोव्यातील भाजपाचे नेते घाबरले आहेत. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय नेते गोव्यात येत आहेत, असे म्हणाले. उमेदवार कें. फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

 

Web Title: my candidacy is that of the troubled common man said viriato fernandes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.