नारायण गावस, पणजी: गोव्याशी माझ्या खूप जुन्या आठवणी जाेडल्या आहेत. माझ्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण हे गाेव्यात झाले आहे. तसेच माझा लग्न सोहळाही गाेव्यातच पार पडला होता. त्यामुळे गाेवा हे माझ्यासाठी खास आहे, असे प्रसिद्ध अभिनेत्री पुजा भट यांनी सांगितले. गोव्यात सुरु असलेल्या ५४ व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवात त्या आल्या असून त्यांनी यावेळी पत्रकारांशी दिलखुलास चर्चा केली.
गोव्यात अनेक चित्रपटांचे शुटींग
गोव्यात सुरुवातीपासून अनेक चित्रपटांचे शुटींग झाले आहे. त्यावेळी मला गाेवा पहायला मिळला. त्याचप्रमाणे या अगोदर अनेक वेळा गोव्यात हाेत असलेल्या इफ्फीमध्ये सहभाग घेतला आहे. गाेव्यात अक्षय कुमार यांच्या सोबत केलेेले अंगारे चित्रपटाचे शुटींग गाेव्यात झाले होते. अशा अनेक चित्रपटांच्या आठवणी गाेव्यात आहेत. गोवा हे चित्रपटांचे चित्रकरण करण्यासाठी चांगले स्थळ असल्याने अनेक चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गाेव्याला पसंद करतात, असे अभिनेत्री पुजा भट यांनी सांगितले.
इफ्फी चित्रपटांसाठी चांगले व्यासपीठ
आंतराष्ट्रीय चित्रपट महाेत्सव हा कलाकार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी एक चांगले व्यासपीठ आहे. या ठिकाणी दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांना प्रतिनिधींचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. तसेच पत्रकार परिषदांचे चांगल्या प्रकारे आयाेजन केले जाते. चित्रपटांवर योग्यरीत्या चर्चा केली जाते. त्याचप्रमाणे चर्चासत्रात कलाकार, दिग्दर्शक, निर्माते तसेच चित्रपटांचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांना एकमेकांशी आपले विचार सुचना शेअर करायला मिळत असते. त्यामुळे इफ्फी हे एक चांगले माध्यम आहे, असे यावेळी पूजा भट यांनी सांगितले.