पणजी - फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी मैदानावर रविवारी झालेल्या ५२ व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेवर पुरुष वरिष्ठ गटात सेनादलाने तर महिला गटात रेल्वेने वर्चस्व राखले. १० किमीच्या शर्यतीत सेनादलाच्या शंकर मन थापा याने सुवर्णपदक पटकाविले. त्याने ३०:१०:५० अशी वेळ दिली. सेनादलच्या प्रताप सिंग याने पुन्हा एकदा रौप्यपदक पटकाविले. त्याने ३० :१२:८० अशी कामगिरी केली. रेल्वेचा अर्जुन कुमार (३०:१३:७०) तिसºया स्थानी राहिला. सर्वसाधारण गटात सेनादलाने १९ गुणांसह बाजी मारली. रेल्वेने दुसरे तर महाराष्ट्र संघाने ६३ गुणांसह तिसरे स्थान पटकाविले.या स्पर्धेत देशभरातील धावपटू सहभागी झाले होते. १० किमी महिला गटात महाराष्ट्राच्या संजीवनी बाबू हिने सुवर्णपदक पटकाविले. तिने ३४:२७:३० अशी वेळ दिली. आॅलिम्पियन ललिता बाबर (३५:१५:७०) हिने रेल्वेकडून प्रतिनिधीत्व केले. ती उपविजेती ठरली. रेल्वेचीच स्वाती गाढवे हिने ३५:२२:४० अशी कामगिरी करीत तिसरे स्थान मिळवले. या गटात रेल्वेचा संघ अव्वल तर महाराष्ट्र संघ दुसºया स्थानी राहिला.मुलांच्या २० वर्षांखालील ८ किमीच्या शर्यतीत उत्तर प्रदेशच्या अजय कुमारने २५:२३:८० असा वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकाविले. पंजाबचा रोहित (२५:३१:२०) दुसºया आणि उत्तर प्रदेशचा धर्मेन्द्र (२५:३९:५०) तिसºया स्थानावर राहिला. मुलींच्या २० वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या पूनम सोनुने हिने सुवर्णपदक पटकाविले. तिने २१:२९:१० अशी वेळ नोंदवली. उत्तर प्रदेशच्या कविता (२१:३२:९०) आणि खूशबू (२२:१२:२०) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.इतर निकाल असा : १८ वर्षांखालील मुले (६ किमी)- अनिल बामनिया (१९:०६:४० ओडिशा), विकास (१९:१५:७० हरयाणा), शिवम यादव (१९:२४:४० मध्य प्रदेश). १८ वर्षांखालील मुली (४ किमी)-चात्रू (१४:१९:५० राजस्थान), जी महेश्वरी (१४:३७:३० तेलंगणा), आकांक्षा प्रकाश शेलार (१४:४६:९० महाराष्ट्र). १६ वर्षांखालील मुले (२ किमी)-अमित कुमार (५:४७:४० राजस्थान), सूरज पाल (५:४८:६० उत्तरप्रदेश) अनिल पांड्या (५:४९:१० ओडिशा). १६ वर्षांखालील मुली (२ किमी)- तई हिरामन (६:४१:६० महाराष्ट्र), बारिय मित्तल (६:५२:४० गुजरात) भाग्य लक्ष्मी (६:५६:३० तेलंगणा).
राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धा : रेल्वे, सेनादलाची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 10:24 PM