गोव्यात सत्ता बदलासाठी राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा आटापिटा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 12:43 PM2018-09-22T12:43:13+5:302018-09-22T12:47:21+5:30

मंत्री होण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराचे प्रयत्न सुरू

ncp mla churchill alemao trying hard to bring congress government in goa | गोव्यात सत्ता बदलासाठी राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा आटापिटा

गोव्यात सत्ता बदलासाठी राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा आटापिटा

Next

पणजी : गोव्यात सत्ता बदलासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार असलेल्या चर्चिल आलेमाव यांनी आटापिटा चालवला आहे. आलेमाव यांना मंत्रीपद मिळवण्याची तीव्र इच्छा आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादीनं अपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन करावी, यासाठी आलेमाव यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

गोव्यात सात वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार अधिकारावर होतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यावेळी तीन आमदार होते. मात्र 2017 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली. चर्चिल आलेमवा यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्यानं त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळवलं आणि ते दक्षिण गोव्यातील बाणावली मतदारसंघातून निवडून आले. आपली कामे व्हायला हवीत म्हणून आलेमाव यांनी कायम मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत आघाडी सरकारला अप्रत्यक्षरित्या साथ दिली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसपासून अंतर राखलं होतं. पण सध्या भाजपच्या सरकारला घरघर लागल्यासारखी स्थिती असल्यानं आलेमाव यांनी वेगळी भूमिका घेत काँग्रेसच्या नेत्यांसोबत हातमिळवणी केली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे आजारी असल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे गोवा विधानसभेत भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही अशी काँग्रेसच्या आमदारांसह आलेमाव यांचीही भावना आहे. पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातील आणखी दोन मंत्रीदेखील रुग्णालयातच आहेत. 

आलेमाव हे सत्तेसाठी कोणताही मार्ग पत्करण्यासाठी गोव्यात प्रसिद्ध आहेत. त्यांनी सध्या भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील विविध घटक पक्ष व अपक्षांना संपर्क साधण्याची खेळी चालवली आहे. काँग्रेसकडे स्वत:चे सोळा आमदार आहेत. सरकारमधील एक जरी घटक पक्ष फुटला व काँग्रेसला येऊन मिळाला तर काँग्रेसची सत्ता येऊ शकते. त्यामुळेच आलेमाव हे सध्या सत्ता बदलासाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान, आलेमाव यांनी याविषयी कुठेही कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. आपण राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचं काहीही ऐकणार नाही. फक्त पवार साहेबांचं ऐकू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. 
 

Web Title: ncp mla churchill alemao trying hard to bring congress government in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.