लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे : पेडणे तालुक्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा, जीएमआर कंपनीने आधी लावलेला न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट हा फलक अद्याप तसाच असल्याने प्रवाशांत संभ्रम निर्माण होत आहे. तालुक्यात दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे आहेत की काय? अशी शंका राष्ट्रीय महामार्गावरू जाणाऱ्या वाहनचालकांना येते. मनोहर इंटरनॅशनल विमातळावरून सध्या ३० पेक्षा जास्त विमाने ये-जा करतात. मात्र, या विमानतळावर रात्रीच्या वेळी विमाने उतरत नसल्याचे समजते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री १० वाजल्यानंतर मोपा विमानतळावर सिग्नल मिळत नसल्याने विमाने उतरत नाहीत. आठ दिवसापूर्वी असेच एक विमान उशिरा या विमानतळावर उतरणार होते. परंतु विमानाला सिग्नल न मिळाल्याने ते दाबोळी विमानतळावर उतरले असे सांगण्यात येते. विमानतळाबाबत अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. हा प्रकल्प खाजगीच कंपनीतच चालवत असल्याने लोकांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. स्थानिकांना रोजगाराच्या संधी नव्हे, तर सध्या टॅक्सी व्यवसायिकांची ही प्रश्न सुटलेले नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटनानंतर मनोहर विमानतळाचे अनावरण करण्यात आले. त्याचवेळी बाहेर सर्वत्र न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट असे फलक झळकत होते. काही दिवसांपूर्वी नागरी उड्डाण खात्याचे अधिकारी सुरेश शानबोग यांनी एक आदेश काढून सर्व फलक मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असे लावावे असा आदेश दिला होता. तरीही राष्ट्रीय महामार्ग धारगळ, रेडकर हॉस्पिटल, सुके कुळण या ठिकाणी आजही न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट तर काही ठिकाणी मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असे फलक दिसून येतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"